Market Committee News : हमाल-मापाऱ्यांतील अस्वस्थता कायम! देवळा, उमराणेसह 2 खासगी बाजार समित्यांमध्ये लिलाव

Nashik News : देवळा तालुक्यात देवळा व उमराणे अशा दोन बाजार समित्या, तर सुनील आहेर कृषी मार्केट व रामेश्‍वर मार्केट या दोन खासगी अशा चार ठिकाणी प्रामुख्याने कांदालिलाव सुरु आहेत.
Deola Onion arrival in the market committee here.
Deola Onion arrival in the market committee here.esakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील लिलाव प्रक्रिया महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर सुरू झाल्या असल्या तरी हमाल-मापाऱ्यांच्या हाताला काम नसल्याने अस्वस्थता कायम आहे. देवळा तालुक्यात देवळा व उमराणे अशा दोन बाजार समित्या, तर सुनील आहेर कृषी मार्केट व रामेश्‍वर मार्केट या दोन खासगी अशा चार ठिकाणी प्रामुख्याने कांदालिलाव सुरु आहेत. (Onion auction in 2 private market committees Deola and Umrane)

कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्यानंतर या सर्वच बाजार समित्यांच्या आवारात सुरुवातीच्या काळात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, अधिक प्रमाणात निर्यातशुल्क लावल्यामुळे निर्यातदार व्यापाऱ्यांना कांदा निर्यातीला मर्यादा पडत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या कांद्याची वाट लागल्यानंतर अटी-शर्ती लागू करुन घेतलेल्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, असे वाटत नाही.

कारण, निर्यातबंदी उठविल्यामुळे कांद्याचे भाव वाढले असले तरी त्यात घसरण कायम आहे. यामुळे शेतकरीवर्गात नाराजीची भावना आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने बळीराजा शेतीच्या पूर्वमशागतीसाठी सरसावला आहे. बियाणे, खते व इतरही खर्चासाठी आर्थिक नियोजन असावे म्हणून आणि लोकसभा निवडणुकीआधी बाजारभाव वाढेल.

या आशेने तो कांदा विक्रीच्या तयारीत आहे. मात्र, बाजारभावात थोडी वाढ होते आणि पुन्हा भाव घसरतात. परिणामी, कांदा आता विकावा की चाळीत साठवावा या द्विधा मनःस्थितीत शेतकरी आहे. हमाल-मापाऱ्यांना काम नसल्याने त्यांच्यातील असंतोष कायम आहे. (latest marathi news)

Deola Onion arrival in the market committee here.
Nashik NMC News : ‘पीटीसी’समोरील वादग्रस्त जागेवर मनपाचाच दावा; सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर

पाण्याची सुविधा अपुरी

बाजार समित्यांमध्ये निवास व पिण्याच्या पाण्याच्या सुविधा काही प्रमाणात उपलब्ध असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. शेतीमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांना रक्कम रोखीने मिळते, ही समाधानाची बाब आहे.

"सध्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक आहे. भावात फारसी सुधारणा दिसून येत नाही. काही बाजार समित्या या शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल दहा ते बारा रूपये तोलाई, हमाली, वाराई, जागाभाडे अशी कपात करतात आहे ते गैर आहे. कुठल्याही प्रकारची कपात न करता शेतकऱ्यांना पेमेंट अदा झाले पाहिजे." - अमर जाधव, कांदा उत्पादक, विठेवाडी

Deola Onion arrival in the market committee here.
Nashik News : देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडलेला चिमुरडा सुदैवाने बचावला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.