पिंपळगाव बसवंत : एकट्या पिंपळगाव बाजार समितीत महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प होऊन त्यातून ५० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू शकले नाही. शेतकऱ्यांसाठी निर्यातीबरोबरच महिन्याभरापासून बंद राहिलेले कांदा लिलाव दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे. (Nashik Onion Auction stopped)
बऱ्याचदा संकट हे गट्टी करून येतात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत तर हे सातत्याने घडत असते. गेली चार महिन्यापासून याची प्रचिती पुन्हा पुन्हा आली. केंद्र शासनाने कांद्याला निर्यातीच्या जोखडात बांधून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या घामाच्या दामावर वरंवटा फिरविला. बाजारभाव निम्यावर आले. हे संकट कमी म्हणून की काय गत महिन्यापासून व्यापारी व मापारी यांच्यात सुरू असलेल्या लेव्हीच्या संघर्षावरून बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प राहीले.
गेली दोन महिन्यापासून नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या हंगामाचा श्रीगणेशा झाला.अगोदर निर्यातबंदीची दृष्ट लागलेली असल्याने सरासरी दीड हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकण्याची वेळ आली.उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांना किमान अडीच हजार रूपया भाव मिळायला हवा होता.
पण निर्यातबंदीने सगळ मुसळ केरात गेले.केंद्र शासनाने नाफेडद्वारे फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदीचा उतारा काढला.पण जखम मांडीला अन मलम शेंडीला..असा उपाय कुचकामी ठरला. निर्यातबंदीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसत असताना व्यापारी व माथाडी कामगारांमधील लेव्हीचा वाद गेली महिन्याभरापासून शेतकऱ्यांच्या मुळावर उठला. (Latest Marathi News)
महिन्यात ५० कोटीची उलाढाल ठप्प
एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे आवक होत असते. महिन्याभरापासून पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प आहे.त्यामुळे सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची विक्री पिंपळगाव बाजार समितीत होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे सुमारे ५० कोटी मिळाले नाही.
बँकांच्या पीक कर्ज परतफेडखरीप हंगामाची तयारी,घरातील मुला-मुलीचे लग्नाचा कांदा लिलाव ठप्प असल्याने खोळंबा झाला.विक्री व्यवस्था नसल्याने कांदा बांधावर,चाळीत पडून राहिला व त्याचा दर्जा ही घसरला. बाजार समितीचे सुमारे ५० लाखांचे उत्पन्न बुडाले.
"अगोदरच निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या चांगल्या कांद्याला मिळणाऱ्या आकर्षक दरापासून मुकावे लागले.व्यापारी व कामगारांचे लेव्ही चे वाद शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले. बंदचा फटका शेतकऱ्यांसोबतच बाजार समित्यांनाही आर्थिक झळ बसली."
-आमदार दिलीप बनकर (सभापती,बाजार समिती,पिंपळगाव बसवंत).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.