लासलगाव : केंद्राने निर्यातमूल्य शून्यावर आणून निर्यातदर २० टक्क्यांवर आणल्याने कांद्याचे दर ४०० ते ५०० रुपयांनी वाढल्याचे दिसून आले. याचा फायदा शेतकरी वर्गाला किती होईल, ते काळच ठरवेल. मात्र, नाफेड आणि शेतकरी प्रोड्युसर कंपन्यांपुढे वेगळाच पेच निर्माण झाला. सध्या वाढलेल्या भावात कांदा खरेदी करणे त्यांना न परवडणारे असल्याचे समोर आले आहे. (onion Buffer stock purchase challenge to NAFED)