Nashik Onion Crisis: उन्हाळ कांदा 1100 रुपयांनी घसरला! लासलगावला शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा फटका

Bazar Samiti ongoing onion auction on Wednesday.
Bazar Samiti ongoing onion auction on Wednesday.esakal
Updated on

लासलगाव : येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दरात पुन्हा ११०० रुपयांची घसरण झाली. बुधवारी (ता. १३) उन्हाळ कांद्याला सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लाल कांद्याची लाली २५० रुपयांनी घसरल्याचे दिसून आले.

लाल कांद्याला १९०० रुपये क्विंटल दर मिळाला. (Nashik Onion Crisis Summer onion falls by Rs 1100 Lasalgaon farmers hit by central governments export ban nashik)

केंद्राने निर्यातबंदीचा तडकाफडकी निर्णय घेतल्यानंतर दररोज कांद्याचे दर घसरत आहेत. निर्यातबंदीपूर्वी ७ डिसेंबरला लाल कांदा सरासरी ३,३६० रुपये प्रतिक्विंटल, तर उन्हाळ कांद्याचे ३,६०० रुपये प्रतिक्विंटल दर होते.

मात्र, निर्यातबंदीच्या निर्णयानंतर लाल आणि उन्हाळ कांदा भावात निम्याहून अधिक घसरण झाल्याचे दिसून आले.

लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये लिलावांना सुरवात झाली, पण कांद्यांचे भाव दररोज घसरत आहेत. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्गात चिंता पाहायला मिळत आहे.

Bazar Samiti ongoing onion auction on Wednesday.
Nashik Onion Rates: नामपूरला कांद्याच्या दरात सुमारे 1800 रुपयांची घसरण

जवळपास ५० ते ७० टक्के कांद्याला अवकाळी व गारपिटीची तडाखा बसला. त्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता.

लाल कांद्याला चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल समाधानकारक भाव मिळत असल्याने उरलेल्या कांदा विक्रीतून उत्पादन खर्च तरी निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, केंद्र सरकारच्या एका निर्णयाने कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडला आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी ७०० रुपये, तर सरासरी १९००, तर जास्तीत जास्त २२७० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी १,०५१ रुपये, सरासरी २१००, तर जास्तीत जास्त २७०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Bazar Samiti ongoing onion auction on Wednesday.
Nashik Onion Purchase : नाफेड, एनसीसीएफचा कांदा गेला कुठे? गौडबंगालचा शेतकऱ्यांचा आरोप, फायदा नेमका कुणाला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.