Nashik Onion Crop Crisis : ‘तो येईल, तो मारणार नाही तो तारीलच’ या भाबड्या आशेने आभाळाकडे डोळे लावून पाहता पाहता दोन महिने उलटले तरीही चांदवड तालुक्यात डबके तुंबेल असा पाऊस झालेला नाही.
तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने कांदा लागवडीस अडचण आल्याने येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अवस्था अतिशय वाईट झालेली आहे.
वरुणराजा ची वाट पाहत आता बळिराजा देखील थकलाय अन् त्याची काळी आई देखील भेगाळली असल्याचे चित्र तालुक्यात आहे. (Nashik Onion Crop Crisis Difficulty in Onion Cultivation Rains Turn Back Increase in farmers problems nashik news)
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी चांदवड तालुक्यातील शेतकरी कांद्याच्या लागवडीत व्यस्त असतात. यंदा मात्र रोपे लावायला आली तरी पावसाअभावी कांद्याची लागवड करता येईना.
तालुक्यात दरवर्षी कांदा उत्पादक शेतकरी लाल कांद्याची लागवड ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात करतात. दुष्काळी चांदवडचे लाल कांदा हेच मुख्य नगदी पीक असून या लाल कांद्यावरच इथले सगळे अर्थकारण अवलंबून असते.
मुलीचे लग्न असो की मुलांचे शिक्षण, सर्वच गोष्टी या लाल कांद्याच्या उत्पन्नावरच ठरतात. म्हणूनच नेहमीच कांद्याला भाव असो वा नसो इथला प्रत्येक शेतकरी हा कांद्याची लागवड करतात.
या कांद्याची लागवड ऑगस्ट मध्ये करण्यासाठी त्यांची रोपे हे जूनच्या पहिल्या आठवड्यातच टाकावी लागतात. यंदा पाऊस अजूनही झालेला नाही. उन्हाळ्यात साठवलेल्या पाण्यावर शेतकऱ्यांनी उळे ( कांद्याचे काळे बियाणे) टाकले.
तुळ, तुळ करून पाणी शिंपडून रोपे शेतकऱ्यांनी जगवली. पाऊस येईलच या आशेवर प्रसंगी पाणी विकत घेऊन रोपे वाढवली अन् ती आता लागवडीसाठी तयार झाली. आता पाऊस नाही आता काय करायचे काय ? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पाऊस नसल्यामुळे विहिरीत पाणी नसल्याने कांद्याची लागवड करता येणार नाही. झिमझिम पावसावर कांद्याची लागवड करावी तर तसाही पाऊस नाही. अगोदरच पेरणी केलेली मका, बाजरी, मुग, भुईमूग पाण्याअभावी सुकायला लागली.
आता पोटच्या पोरासारखे सांभाळलेले रोपा लावायला आले तर पाणी नाही. त्यामुळे ही रोपे वाया जाण्याची भीती आता शेतकऱ्यांना वाटत आहे. एकूणच यंदाचा संपूर्ण हंगामच वाया जाण्याची भीती आहे.
कांदा लागवड लांबणीवर
पाऊस नसल्याने लाल कांद्याची लागवडीसाठी उशीर होणार आहे. अजून पंधरा ते वीस दिवस पाऊस आला नाही तर रोपेही वाया जातील अन् कांद्याचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे. लाल कांद्याची लागवड उशिरा होणार असल्याने उन्हाळ कांद्याचे भाव वाढतील यात शंका नाही.
"आम्ही दरवर्षी दहा ते बारा एकर लाल कांद्याची लागवड करतो. त्यासाठी यंदा दहा पायलीचे रोप टाकले आहे. आता ते लावायला आले. पण पाऊस नसल्याने लागवड करता येईना. विहिरीतील साठवलेले पाणी संपले आहे. आता हे लावायला आलेले रोप जगवायचे कसे हा प्रश्न आहे." - दिगंबर सोनवणे, दुगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.