Nashik Onion News : मालेगाव तालुक्यात 15 टक्के कांदा लागवड वाढणार; तालुक्यात 22 हजार हेक्टरवर कांदा लागवड

Latest Onion News : यंदा समाधानकारक व कांद्याला भाव असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. यंदा कांद्याचे लागवड क्षेत्र सुमारे १० ते १५ टक्के वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
onion sowing
onion sowingesakal
Updated on

मालेगाव : मालेगाव तालुक्यात ९५ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड होते. तालुक्यात ७ हजार २७३ हेक्टरवर खरीप कांद्याची लागवड करण्यात आली आहे. यंदा समाधानकारक व कांद्याला भाव असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. यंदा कांद्याचे लागवड क्षेत्र सुमारे १० ते १५ टक्के वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. (Onion cultivation will increase by 15 percent in Malegaon taluka)

मालेगाव तालुक्यात गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. तालुक्यात बाजरी कापणे, मुंग, उडीद, भुईमूग, मका, सोयाबीन ही पिके काढणीवर आली आहेत. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी जमिनीची मशागत करण्यास सुरवात केली आहे.

येथे जून ते ऑगस्टपर्यंत ७ हजार २७३ हेक्टरवर खरीप लाल कांदा लागवड झाली आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी लेट खरीप कांदा लागवड करताना दिसत आहेत. लेट खरीप (पोळ) कांदा सप्टेंबर ते ऑक्टेाबर या महिन्यात लागवड होते.

गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने कांद्याचे क्षेत्र घटले होते. यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. बाजारात कांद्याला मागणी आहे. गेल्या वर्षी खरीपमध्ये ५ हजार २०० हेक्टरवर तर खरीप व लेट खरीप दोन्ही मिळून १८ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. (latest marathi news)

onion sowing
अडवाणींवर लागू झालेला निवृत्तीचा नियम मोदींवर का लागू होत नाही? केजरीवालांचे मोहन भागवतांना पत्र, विचारले 5 महत्वाचे प्रश्न

यंदा खरीपमध्येच ७ हजार २७३ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. तसेच लेट खरिपात १५ हजार हेक्टरवर कांदा लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. यंदा ४ हजार २७३ हेक्टरवर कांद्याचे क्षेत्र वाढणार आहे. बहुसंख्य शेतकरी उन्हाळी कांद्याची लागवड करतात. यंदा मालेगाव, दाभाडी, सौंदाणे, झोडगे या चार मंडळातील दाभाडी मंडळात २ हजार ६७४ हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाला आहे.

"यंदा समाधानकारक व कांद्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. यंदा सुमारे १० ते १५ टक्के कांदा लागवड क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे."- भगवान गोर्डे (तालुका कृषी अधिकारी, मालेगाव)

onion sowing
Sanjay Raut News : गद्दारी करणारे विधानसभेत दिसणार नाहीत; संजय राऊत यांची टीका; मनमाड येथील सभेत फुंकले निवडणुकीचे रणशिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.