सटाणा- देवळा : बाजार समित्यांचे लिलाव गेल्या १५ दिवसांपासून बंद असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हितासाठीच शेतकरी संघटना आणिव व्यापारी यांनी एकत्र येऊन खासगी जागेवर लिलाव सुरू केले आहेत. बाजार समित्यांचा बंद पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे सांगत तो मागे घ्यावा आणि लिलाव सुरू करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी आज येथे जिल्हा उपनिबंधकांनी घेतलेल्या बैठकीत केली. (Nashik Private procurement for benefit of farmers marathi news)
खासगी जागेत कांदा लिलाव सुरू केल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार सोमवारी (ता.१५) देवळा येथे येऊन याबाबत चौकशी करण्यात आली. सटाण्याचे सहायक निबंधक जितेन्द्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कळवण रस्त्यावरील नविन खासगी जागेतील कांदा खरेदी केंद्राची पाहणी करत अहवाल सादर केला.
सकाळच्या सत्रातील लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्याने पथकाला तेथील व्यापारी, शेतकरी यांच्याशी संपर्क साधता आला नाही. दुपारनंतर श्री. शेळके यांनी देवळा बाजार समितीच्या कार्यालयात व्यापारी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व बाजार समिती प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन व्यापारी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मेतकर व दीपक गोसावी यांनी सांगितले, की शेतकरी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लिलाव सुरू करण्यासाठी आग्रह धरल्याने तसेच बाजार समित्या बंद असल्याने मोठे नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खासगी जागेवर कांदा खरेदी सुरू केली आहे. (latest marathi news)
स्वाभिमानी संघटनेचे कुबेर जाधव म्हणाले,‘ गेल्या १५ दिवसांपासून बाजार समितींचे लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचा धोका आहे. शेतकऱ्यांचा कांदा शेतात पडून आहे हे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना विनंती केली, शेतकऱ्यांच्या हितासाठी खासगी जागेवर कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहे.
बाजार समित्यांचा १५ दिवसांपासून असलेला बंद पूर्णपणे बेकायदेशीर असून तो तात्काळ मागे घेऊन लिलाव सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी कुबेर जाधव, कृष्णा जाधव, माणिक निकम, महेंद्र आहेर, कैलास कोकरे, महेंद्र परदेशी आदी शेतकरी प्रतिनिधींनी निबंधक जितेन्द्र शेळके यांच्याकडे केली. बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, सहकारी संस्थांचे लेखापरीक्षक राजेंद्र हांडोरे, सटाणा बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे, देवळ बाजार समितीचे सचिव माणिक निकम, महेंद्र परदेशी, कैलास कोकरे, व्यापारी दिनकर सूर्यवंशी, शेखर आहेर आदी उपस्थित होते. (latest marathi news)
केंद्राची कांदा खरेदी कुणासाठी?
मालेगाव : कांदा निर्यातबंदी कायम ठेवून केंद्र शासन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पाच लाख टन कांदा खरेदी करणार आहे. सारखा बफर स्टॉक करून ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध व्हावा हा त्यामागील उद्देश आहे. मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हीखरेदी नेमकी कुमासाठी असा प्रश्नही कुबेर जाधव यांनी केला आहे.
केंद्राच्या खरेदीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कुठेलेही हीत जोपासले जाणार नाही ही खेदाची बाब आहे. ही खरेदी नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात सामान्य शेतकरी व उत्पादक कंपन्यांना वाव दिला जाण्याची शक्यता कमी आहे. या दोन्ही सरकारी संस्थांची आजवरची कांदा खरेदी कशी आणि कुठे केली जाते हा संशोधनाचा विषय आहे.
खरेदीत होणारा काळाबाजार, गैरव्यवहार याला आळा कसा बसणार? या खरेदीमुळे कांद्याचे पडलेले दर कसे नियंत्रणात ठेवले जाणार आहे? याचा फायदा कुणाला? नुकसान कुणाला होणार आहे? कांद्याच्या उत्पादनात खरंच घट झाली का? देशात किती कांद्याच उत्पादन होणार आहे? या प्रश्नांसंदर्भात केंद्र सरकार कोणत्या उपाययोजना राबविणार आहे हा उत्सुकतेचा विषय आहे. कांदा निर्यात बंदी उठविणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.