लासलगाव : केंद्र सरकारने निर्यात होणाऱ्या कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क व किमान निर्यात मूल्य ५५० केल्याने याचा मोठा परिणाम निर्यातीवर झाला असून परकीय चलनामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. देशातून एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या बारा महिन्यात कांदा निर्यातीतून ३८७४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे कांदा निर्यात व्यवसाय आणि या संबंधीच्या घटकाला मोठा फटका बसला आहे. (Onion export hit by 40 percent duty with minimum export value)