Nashik Onion Export : कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्यापासून एप्रिल ते जून या कालावधीत निर्यात निम्म्यापेक्षा खाली आली आहे. निर्यात शुल्क वाढवून किंवा ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’चा कांदा बाजारात उतरवूनही भाव टिकून आहेत. स्थानिक बाजारात सद्यस्थितीला तीन हजार ५०० ते चार हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. गेल्या वर्षी एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत देशातून २५ लाख २५ हजार टन कांद्याची निर्यात झाली. म्हणजेच महिन्याला सरासरी दोन लाख टनांपेक्षा जास्त निर्यात झाली. (Onion exports halved after levy in market )