मालेगाव : तालुक्यासह कसमादेतून लाल कांद्याची आवक अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर घसरत आहेत. दर कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणतांना हात आखडता घेतला आहे. गेल्या अकरा दिवसात कांद्याचे भाव तब्बल ६०० रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मध्यप्रदेश, गुजरात व कर्नाटकमधून कांद्याची आवक वाढत असल्याने कसमादेतील कांद्याचे भाव कमी होत असल्याचे सांगितले जाते. (Nashik Onion fell by Rs 600 in eleven days marathi news)
गेल्या १५ दिवसापासून विविध बाजार समित्यांमध्ये भावात घसरण होत आहे. येथील बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात ७ मार्चला कांद्याला २ हजार ११० रुपये क्विंटल सर्व्वोच्च भाव मिळाला होता. अकरा दिवसांनी १८ मार्चला कांद्याला सर्वोच्च १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.
गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात कांद्याला जेमतेम भाव मिळाला. कांद्याला चांगला भाव मिळत असतांना केंद्र शासनाने ८ डिसेंबरला निर्यातबंदी जाहीर केली. तेव्हापासूनच भाव सातत्याने कमी होत गेले. केंद्र शासनाने बांगलादेश व युएईला कांदा निर्यातीची परवानगी दिल्यापासून भावात काही प्रमाणात सुधारणा झाली होती. (latest marathi news)
कांद्याने दोन हजाराचा टप्पा ओलांडला होता. भाव आणखी वाढतील अशी अपेक्षा असतानाच मध्यप्रदेश, गुजरात व कर्नाटकमधील कांदा मोठ्या संख्येने देशांतर्गत बाजारपेठांमध्ये येत आहे. या तीनही राज्यातील कांद्यामुळे कसमादेतील कांद्याचे भाव कमी झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कमी प्रतीच्या कांद्याला अल्प दर
येथील बाजार समितीच्या मुंगसे बाजारात सोमवारी (ता. १८) ४९५ वाहनातून साधारणत: ८ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. लाल सुपर १४०० ते १५०० रुपये भाव होता. ॲव्हरेज सुपर १२०० ते १३५०, ॲव्हरेज गोल्टा १००० ते ११५०, गोल्टी ८०० ते ९०० दरम्यान भाव होता. बहुतांशी कांदा ९०० ते १००० रुपये दरम्यान विकला गेला. कमी प्रतीच्या कांद्याला अवघा तीनशे ते साडेतीनशे रुपये भाव होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.