Nashik Onion News : कांदा पुन्हा रडवणार महिन्यात भाव दुप्पट

Nashik News : विविध कारणांमुळे कायम चर्चेत असणारा व अचानक भाववाढीमुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा पुन्हा एकदा वाढलेल्या किमतीमुळे चर्चेत आला आहे.
Onion
Onion esakal
Updated on

Nashik News : विविध कारणांमुळे कायम चर्चेत असणारा व अचानक भाववाढीमुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा पुन्हा एकदा वाढलेल्या किमतीमुळे चर्चेत आला आहे. एक महिन्यापूर्वी २० रुपये किलो असलेला कांदा आता किरकोळ विक्रीसाठी ४० रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होत आहे. त्यामुळे किचनचे बजेट चांगलेच बिघडले आहे. कांदा हा सर्वांसाठीच चर्चेचा विषय कायम राहिलेला आहे. (Nashik Onion News)

जर एका महिन्यातच दुप्पट भाव होत असतील तर भविष्यात कांदा खिशाच्या बजेटवर अधिक भार देणार आहे, हे मात्र निश्चित. १९९८ मध्ये केंद्र सरकार पाडण्यास कारणीभूत ठरलेला कांदा दरवर्षीच राष्ट्रीय स्तरावरचा विषय असतो. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन एक आठवडा होतच नाही तोच कांदा चांगलाच कडाडला आहे.

त्यामुळे आधीच भडकलेल्या महागाईत आणखी तेल ओतले जाण्याची चिन्हे आहेत. सर्वसामान्य त्यामध्ये होरपळून निघणार आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ विक्रीसाठी वाहतूक खर्च व तसेच कांदा खरेदीनंतर दोन-तीन दिवसांनी १०० किलोमधील किमान दोन-तीन किलो कांदा खराब होतो. त्यामुळे सद्यस्थितीला किरकोळ मार्केटमध्ये चाळीस रुपये प्रति किलो कांदा विक्री होत आहे. (latest marathi news)

Onion
Nashik Mango News : यूएसए, ऑस्ट्रेलियाला 1 हजार टन आंबा निर्यात; कोकणचा हापूसही कृषक विकिरण केंद्रातून विदेशात

"वातावरण खराब असल्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत कांद्याच्या भावांमध्ये अल्प बदल झालेला आहे. उत्तर भारतामध्ये कांदा उपलब्ध आहे. त्यामुळे किमान एक ते दीड महिना कांद्याच्या किमतीमध्ये वाढ होणार नाही, असे चित्र आहे." - अतुल शहा, कांदा व्यापारी

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांतील कांद्याचे प्रतिक्विंटल भाव

१० जून ३१६० रुपये

११ जून २९१६ रुपये

Onion
Nashik News : एअरलाईन्सचा गलथानपणा! विमान प्रवाशांना घेऊन हैदराबादला अन लगेज् नाशिकमध्येच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.