पिंपळगाव बसवंत : आठ महिन्यांनंतर कांद्याच्या दराने पाच हजार रुपये प्रतिक्विंटलची पातळी ओलांडली आहे. पिंपळगाव बाजार समितीत कांद्याची आवक घटल्याने दरात जोरदार उसळी आली आहे. साडेपाच हजार रुपयांच्या पुढे बाजारभावाने झेप घेतली आहे. दरवाढ झाली असली, तरी शेतकऱ्यांकडे अवघा २० टक्के उन्हाळ कांदा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीचा फारसा लाभ होण्याची चिन्हे नाहीत. (Onion price at five half thousand)