Nashik Onion Price: पिंपळगांव अन् मनमाड बाजार लिलावात लाल कांद्याचे जोरदार ओपनिंग!

Onion auction
Onion auctionesakal
Updated on

पिंपळगांव बाजारात लाल कांद्याचे 4 हजार 200 रुपये भावाने स्वागत

पिंपळगांव बसवंत : बहुप्रतिक्षीत लाल कांदा अखेर पिंपळगांव बाजार समितीत लिलावासाठी दाखल झाला. लाल कांद्याचे सरासरी चार हजार २०० रूपये क्विंटल या भावाने स्वागत झाले. बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत लाल कांद्याच्या लिलावाचा प्रारंभ करण्यात आला. (Strong opening of red onion in Pimpalgaon and Manmad market auction Nashik)

पावसाअभावी लाल कांद्याचे महिनाभर उशिराने आगमन झाले आहे. एक हजार ८०० क्विंटल लाल कांदा बाजार समितीत विक्रीसाठी आला. किमान दीड हजार, तर कमाल पाच हजार १२५ आणि सरासरी ४ हजार २०० रुपये क्विंटल या भावाने लाल कांद्याची विक्री झाली.

सुमारे एक कोटी रूपयांची उलाढाल लाल कांद्याच्या खरेदी-विक्रीतून झाली. हंगामाच्या सुरवातीला लाल कांद्याच्या भावात तेजी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसले.

लाल कांद्याच्या शुभारंभासाठी बाजार समितीचे संचालक सोहनलाल भंडारी, शंकरलाल ठक्कर, नारायण पोटे, ज्ञानेश्‍वर शिरसाट, अतुल शाह, जेठमल ठक्कर, शोभाचंद पगारिया, दिनेश बागरेचा, संकेत पारख, सचिव संजय लोढें आदी उपस्थित होते.

"जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठी पिंपळगांव बाजार समितीला प्रथम पसंती असते. चोख व्यवहार व रोख पेमेंट ही लिलाव या नियमाची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी प्रतवारी करून कांदा लिलावासाठी आणावा."

- आमदार दिलीप बनकर (सभापती, बाजार समिती, पिंपळगांव बसवंत)

Onion auction
Nashik Onion News : उद्यापासून मुंगसे कांदा बाजार सुरु होणार; उन्हाळी कांद्याची आवक वाढणार
बाजार समितीमध्ये लिलाव सुरू झाल्याने कांद्याचे आलेली वाहने.
बाजार समितीमध्ये लिलाव सुरू झाल्याने कांद्याचे आलेली वाहने.esakal

मनमाड बाजारात लाल कांद्यास सरसरी ३ हजार ६०० रुपये भाव

मनमाड : तब्बल दहा दिवसांच्या दिवाळी सुट्ट्यानंतर सोमवारी (ता.२०) मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, मकासह शेतीमाल लिलावाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले. बाजार समिती सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याला सरासरी २ हजार ७०० रुपये क्विंटल भाव मिळाला.

दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्यानिमित्त गेल्या दहा दिवसांपासून मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. दिवाळी सुट्टी संपल्यामुळे बाजार समितीत लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले.

सकाळ सत्रात उन्हाळ कांद्याचा २३५ ट्रॅक्टर आले होते. यात कमीतकमी १ हजार रुपये तर जास्तीत जास्त ३ हजार ३०२ रुपये तर सरासरी २ हजार ७०० रुपये भाव मिळाला. सकाळ सत्रात लाल कांद्याचा २७० ट्रॅक्टर आले होते.

लाल कांद्याला कमीतकमी २ हजार ३५० रुपये तर जास्तीत जास्त ४ हजार १०० रुपये तर सरासरी ३ हजार ६०० रुपये भाव मिळाला. सकाळ सत्रात मक्याचे ११५ ट्रॅक्टर आले होते.

यात कमीतकमी १ हजार ९९० रुपये तर जास्तीत जास्त २ हजार ३०१ रुपये तर सरासरी २ हजार १८० रुपये भाव मिळाला. मुगाला कमीतकमी ६ हजार ९०० रुपये आणि जास्तीत जास्त १० हजर ९०० तर सरासरी १० हजार ८०१ रुपये भाव मिळाला.

गव्हास कमीत कमी २ हजार ५५० जास्तीत जास्त २ हजार ९०१ सरासरी २ हजार ६०१ रुपये भाव मिळाला. हरभऱ्यास कमीत कमी ५ हजार १२१, जास्तीत जास्त ७ हजार ८०० सरासरी ५ हजार ७४१ रुपये भाव मिळाला.

बाजरीला कमीतकमी २ हजार १००, जास्तीत जास्त २ हजार ३००, सरासरी २ हजार १७६ रुपये भाव मिळाला, सोयाबीन कमीतकमी ४ हजार ९३० जास्तीत जास्त ५ हजार १४२ सरासरी ५ हजार १२१ रुपये इतका भाव मिळाला.

Onion auction
Onion Rate Hike: लासलगावमध्ये लाल कांदा भावात 1600 रुपयांची वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.