चांदवड : कांदा हे भारतातील महत्त्वाचे पीक आहे. कांदा उत्पादनात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. विशेषतः चांदवड, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो. मात्र, कांदा उत्पादकांना बाजारातील अनियमितता, हवामानातील बदलांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कांदा साठवण आणि विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर मर्यादा येतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना तोट्याचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत कांदा प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीचा बनू शकतो. (Onion processing industry will be path to economic prosperity)
प्रक्रिया उद्योगाच्या पद्धती
कांदा पावडर : सुकवलेल्या कांद्यापासून तयार केलेली पावडर मसाले, खाद्य पदार्थ आणि स्नॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कांदा पावडरची आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्यामुळे ही प्रक्रिया शेतकऱ्यांना निर्यातीतून फायदा मिळवून देते.
कांदा फ्लेक्स: कांद्याचे लहान लहान तुकडे करून ते सुकवून तयार केलेले फ्लेक्स सूप, सॉस, मसाले आणि इतर खाद्य पदार्थांमध्ये वापरले जातात. हे उत्पादन जागतिक बाजारात प्रचलित आहे.
कांदा पेस्ट : कांद्याची पेस्ट तयार करून ती विविध खाद्यपदार्थांच्या तयारीसाठी वापरली जाते. ही पेस्ट पॅक करून विकली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो.
कांद्याचे आचार : लहान आकाराच्या कांद्यापासून आचार तयार करणे हा एक लोकप्रिय उपक्रम आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे विविध प्रकारे विक्री करण्याची संधी मिळते.
फ्रोजन कांदा : कांद्याचे तुकडे करून ते गोठवून विक्री केले जातात. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यप्रक्रिया उद्योगांत या फ्रोजन कांद्याला मोठी मागणी आहे.
कांद्याचे चिप्स : कांद्याचे चिप्स तयार करून स्नॅक्स म्हणून विकले जातात. या चिप्स विविध फ्लेवर्समध्ये उपलब्ध असतात आणि ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. (latest marathi news)
प्रक्रिया उद्योगाचे फायदे
साठवणुकीची समस्या कमी होते. कांदा त्वरित विकण्याची गरज कमी होते. प्रक्रिया केलेला कांदा जास्त काळ टिकतो. त्यामुळे शेतकरी वेळेवर विक्री करू शकतात. शेतकऱ्यांचे उत्पादन कमी होणार नाही. कारण प्रक्रिया केलेल्या कांद्याची मागणी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात अधिक असते. स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण होतो. नियमित उत्पन्नामुळे कर्जाची चिंता कमी होते.
गुंतवणूक कशी करावी?
सरकारी योजनांचा लाभ : शेतकऱ्यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ घेता येतो. यामुळे ते कमी व्याज दरावर कर्ज घेऊन प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतात. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी संस्था तयार कराव्यात. सहकारी प्रक्रिया उद्योगामध्ये गुंतवणूक केल्यास एकत्रित उत्पन्न वाढण्याची संधी मिळते.
साधनांचा वापर
आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रियेसाठी आवश्यक साधनांचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षमतेने उत्पादन प्रक्रिया करता येईल. यातून उत्पादनाचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढविण्यास मदत करते.
कांद्याला चांगला भाव कसा मिळेल?
शेतकऱ्यांना उत्पादक समूह तयार करून थेट बाजारात विक्री करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो. यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळता येतो आणि बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळते. निर्यातीत वाढ झाल्यास शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेचा फायदा मिळू शकतो.
कांदा इस्टेट स्थापनेची संकल्पना
चांदवड आणि देवळा तालुका नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादनात महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातील अस्थिरता, साठवणुकीची समस्या आणि कमी बाजारभाव यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून डाळिंब इस्टेटच्या धर्तीवर येथे कांदा इस्टेट स्थापन करण्याची संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.