लासलगाव : केंद्र सरकारतर्फे सुरू असलेल्या कांद्याबाबतचा खेळ सुरूच असून त्याचा फटका कांदा उत्पादकांचा बसत आहे. ‘एनसीसीएफ’ने कांदा खरेदीचे पोर्टल सात दिवसापासून बंद केल्याने कांदा खरेदी थांबविण्यात आली आहे. यातच कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात दोनशे रुपयाची घसरण झाली. (Onion purchase has been stopped as NCCF has closed onion purchase portal for seven days)
यामुळे कांद्याचे सरासरी बाजारभाव तीन हजार रुपयांच्या आता आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून ग्राहकांच्या हितासाठी किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेड, एनसीसीएफ या संस्थेच्यामार्फत पाच लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवून खरेदी सुरू झाली.
मात्र उद्दिष्ट पूर्ण होण्याअगोदरच खरेदीचे पोर्टल बंद केल्याने कांदा खरेदी थांबली आहे. यातच जिल्ह्यातील बाजार समिती कांद्याची आवकेत अल्पशी वाढ झाल्याने लासलगाव बाजार समितीत ३ हजार १०० ते ३ हजार ३०० रुपये कांदा दर मिळत असताना कांदा दरात २०० रुपयांची घसरण झाली.
खरेदीचा टप्पा पूर्ण कसा?
एनसीसीएफ संस्थेमार्फत कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पोर्टल बंद केल्याचे सांगितले जात आहे. पण नाफेडमार्फत सुरू असलेल्या कांद्याची खरेदी २४ हजार मेट्रिक टनापर्यंत गेल्या आठवड्यात केल्याची चर्चा असताना मग एनसीसीएफच्या खरेदीचा अडीच लाख मेट्रिक टनाचा टप्पा कसा पूर्ण झाला ? असा प्रश्न तयार झाला आहे. (latest marathi news)
"केंद्र सरकारकडून पाच लाख मॅट्रिक टन इतका कांद्याचा बफर स्टॉक केला जाणार होता. लोकसभा निकालानंतर कांद्याची खरेदी सुरू करण्यात आली. मात्र कमी कालावधीत इतकी मोठी खरेदी झाली कशी? खरेदी अगोदरच एक हजार रुपयांच्या जवळपास बाजारभाव असतानाच करत तो कांदा खरेदी केल्याचे दाखविला गेल्याचा संशय आहे. खरेदीत मोठा घोटाळा झाला का अशी शंका या निमित्ताने उपस्थित होते.' - भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
‘एनसीसीएफ’ने ज्या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला, अशा शेतकऱ्यांची यादी तयार करत खरच कांदा विक्री केला आहे का? याची चौकशी केली पाहिजे. यात मोठा घोटाळा झाल्याची शंका आहे. बाजार समितीच्या तुलनेत पाचशे रुपये कमी दराने कांद्याची खरेदी केली जात असताना यांना कोणता शेतकरी कांदा देईल? - सुनील गवळी, शेतकरी ब्राम्हणगाव (विंचूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.