Onion Purchase : ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ची कांदा खरेदी बंद ठेवावी! गैरप्रकाराची सखोल चौकशी करावी

Nashik News : केंद्र सरकारने यंदा बफर स्टॉकसाठी ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
Onion Purchase
Onion Purchase esakal
Updated on

Nashik News : ‘नाफेड’चे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या एका कांदा खरेदी-विक्री केंद्रावर अचानक दिलेल्या भेटीत शेतकऱ्यांकडून नाहीतर बाजार समितीतून कांदा खरेदी केला जात असल्याचे तसेच कांदा खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. (Onion purchase of NAFED and NCCF should be stopped organization has made demand)

या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, जोपर्यंत ‘नाफेड’ ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीतील बोगसगिरीची सखोल चौकशी होत नाही. तोपर्यंत ‘नाफेड’ ‘एनसीसीएफ’साठी बफर स्टॉकचा कांदा खरेदी करणाऱ्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे कांदा खरेदीचे काम केंद्र सरकारने तत्काळ बंद करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या प्रकारानंतर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी संघनेची भूमिका मांडत पत्रक प्रसिद्ध केले आहे. केंद्र सरकारने यंदा बफर स्टॉकसाठी ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यातील प्रत्येकी अडीच लाख टन कांदा ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून नाशिकसह धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, बीड.

धाराशिव, सोलापूर आदी जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना निवेदनाद्वारे कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्याचे महासंघ व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणे आवश्यक होते. परंतु संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आधीच स्वस्त दरातील कांदा गुदामात भरून ठेवला होता. आता ‘नाफेड’चे कांदा खरेदीचे दर वाढल्यानंतर हाच स्वस्तातील कांदा ‘नाफेड’साठी खरेदी केल्याचे दाखविले आहे. (latest marathi news)

Onion Purchase
Nashik CM Shinde Daura : शिक्षक आणि संस्थाचालकांच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांकडू कांदा खरेदी न करता बाजार समितीतून व्यापारी खळ्यांवरील कांदा खरेदी केला जात होता. ऑनलाइन कांदा खरेदी विक्रीमध्ये घोटाळा केल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्राच्या कांदा खरेदीत शेतकरी उत्पादक कंपन्या, अधिकारी आणि व्यापारी यांची साखळी तयार होऊन ‘नाफेड’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची कांदा खरेदीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.

यामध्ये कांदा खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे खुद्द ‘नाफेड’चे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनीच मान्य केले आहे. संघटनेने यापूर्वीच ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या कार्यालयामध्ये जाऊन लेखी पत्राद्वारे तसेच ई-मेल करून संपूर्ण कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने करावी. तसेच बफर स्टॉकसाठीच्या कांदा खरेदीत शेतकऱ्यांना सर्वाधिक दर मिळावा, यासाठी ‘नाफेड’ ‘एनसीसीएफ’ने थेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून लिलाव प्रक्रियेतून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा, अशी मागणी केली होती.

मात्र आता गैरप्रकार उघड झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशी होईपर्यंत ‘नाफेड’ ‘एनसीसीएफ’साठी बफर स्टॉकचा कांदा खरेदी करणाऱ्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे कांदा खरेदीचे काम केंद्र सरकारने तत्काळ बंद करावे, अशी मागणी संघटनेने पत्रकात केली आहे.

Onion Purchase
Nashik Division Teachers Constituency Election: शिक्षक, शिक्षण अन शिक्षणसंस्थांना न्याय देणार : ॲड. संदीप गोपाळराव गुळवे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.