लासलगाव : कांदा निर्यातबंदी व निर्यात शुल्कच्या कचाट्यातून बळीराजाला पूर्णपणे जखडले असताना केंद्र सरकारने भाव स्थिरीकरण निधीअंतर्गत केलेला बफर स्टॉक बाजारात आणण्यासाठी पावले उचलण्याचे धोरण अवलंबले आहे. कांदा भावात सुरू असलेली घसरण काही केल्याने थांबत नाही.
शिवाय ग्राहकांची कोणतीही ओरड नसताना मग सरकारकडून एवढी घाई कशासाठी होत आहे, असा यक्ष प्रश्न कांदा उत्पादकांना पडला आहे. एकूणच विक्री काढलेल्या कांद्यामुळे उत्पादकांचा मात्र वांदा होणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. (producers in trouble due to procurement through NAFED NCCF of onion)