लासलगाव : केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यातशुल्क २० टक्क्यांनी घटविल्याचे पडसाद आज येथील बाजार समितीत उमटले. कांद्याचे दर चारशे ते पाचशेंनी वधारले आहेत. लासलगावला चारशे, तर मनमाडला पाचशे रुपये क्विंटलमागे वाढ झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडे आता फारसा कांदा नसताना शुल्क घटविल्याचा फारसा लाभ होणार नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (Onion rises after export duty cut )