Nashik Onion News : मार्च अखेर तसेच लेव्हीच्या मुद्द्यावर गेल्या पंधरा दिवसापासून येथील बाजार समिती बंद असल्याने कांदा खरेदी विक्री ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत असून या कालावधीत सुमारे दहा कोटीची कांद्याची उलाढाल ठप्प झाली. शुक्रवार (ता.१२) व्यापाऱ्यांनी खासगी जागेवर कांदा खरेदी केल्याने शेतकऱ्यांना आपला कांदा विक्री करता आला आहे. (Nashik Onion Turnover stalled at 10 crore due to purchase ban in yeola marathi News )
मार्च अखेरीमुळे २८ मार्चपासून तर एप्रिल सुरु होताच हमाल मापारी, व्यापारी यांचा बेकायदेशीर संप यामुळे बाजार समित्यांचे लिलाव बंद आहेत. लेव्हीच्या मुद्द्यावर हमाल मापाऱ्यांनी कामकाजात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. नो वर्क नो वेजेस याची अंमलबजावणी व्हावी म्हणून व्यापारी वर्ग आग्रही आहे. तर हमाली, तोलाई व वाराई कपात करणार नाही अशी भूमिका घेत आम्ही कामकाजासाठी तयार आहोत अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे.
या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी असल्याने त्याचा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सलग १५ दिवस लिलाव बंद असून आहे. हमाल,मापारी अन व्यापाऱ्यांच्या वादावर कोणताही तोडगा न निघाल्याने संप सुरूच असल्याने कांदा उत्पादक शेतकरी, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीवर अवलंबून असलेले अनेक घटकही आर्थिक अडचणीत आला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २८ मार्चपासून ठप्प असून लाखो रुपयांचे व्यवहार थंडावले आहेत. या बंदमुळे अडचणीत आले आहेत. मागील १५ दिवसांपासून कांदा लिलाव बंद असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. (latest marathi news)
सुमारे ७५ हजार क्विंटल कांदा खरेदीवर परिणाम
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार आवार अंदरसुल, उपबाजार आवार डोंगरगाव येथे बेमुदत बंदच्या अगोदर दररोज सरासरी ५ ते १० हजार क्विंटल कांद्याची आवक होते. १५ दिवसापासून सुरू असलेल्या बंदमुळे सुमारे ७५ हजार ते लाख क्विंटल कांद्याच्या खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने शहरातील बाजारपेठही थंडावल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शुक्रवारी व्यापाऱ्यांनी खासगी जागेत खासगीरीत्या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला. यामुळे तब्बल पंधरा दिवसानंतर शेतकऱ्यांना आपला कांदा विकण्याची संधी मिळाली आहे.
''शेतकऱ्यांना लिलाव बंद ठेवून वेठीस धरणे चुकीचे आहे. मार्च अखेर कर्जाचे नव्या- जुन्यासह लग्नसराईसाठी खूप महत्त्वाचा असतो. अशा वेळेस लिलाव बंद ठेवून शेतकऱ्यांना विनाकारण वेठीस धरणे चुकीचे आहे. यावर तत्काळ मार्ग काढून शिवार खरेदी किंवा खासगी खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.''- संतू पाटील झांबरे, शेतकरी संघटना नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.