Nashik News : लोकसंख्येच्या तुलनेत नाट्यगृह अवघी दोनच! कालिदास कलामंदिर, परशुराम साईखेडकर नाट्यगृहावर भार

Nashik News : २५ लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरात केवळ कालिदास कलामंदिर, परशुराम साईखेडकर दोनच नाट्यगृह असल्याची शोकांतिका आहे.
drama theater
drama theateresakal
Updated on

Nashik News : निवडणुकीत उमेदवारांसह त्यांच्या पक्षांच्या अजेंड्यात सांस्कृतिक क्षेत्राला स्थान दिले जात नाही. केवळ कागदावर दाखवण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून एखादा महोत्सव घेण्यात येतो. प्रत्यक्षात महोत्सवाला प्रेक्षक आहे का? कलाकार, प्रेक्षक, कार्यक्रमाचे ठिकाण, सादरीकरणातील अडचणी या कोणत्याही घटकांचा विचार केला जात नसल्याचे दिसते. (Nashik only 2 theaters in city of 25 lakh population)

याचे उत्तम उदाहरण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात झालेला ‘फ्लॉप’ महासंस्कृती महोत्सव. कला कोणतीही असो.. गायन, वादन, अभिनय, नृत्य कला माणसाला वाईट वृत्तीपासून परावृत्त करून चांगला माणूस घडविण्याचे मोठे काम करते. कोणत्याही शहराची प्रगती शहरात राबविल्या जाणाऱ्या सांस्कृतिक घडामोडींवर अवलंबून असते.

सध्या शहरात ज्या गतीने गुन्हेगारीत वाढ होत आहे त्या तुलनेने शहरातील सांस्कृतिक चळवळीला बकालपणा आला आहे. २५ लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरात केवळ कालिदास कलामंदिर, परशुराम साईखेडकर दोनच नाट्यगृह असल्याची शोकांतिका आहे. पैकी कालिदास कलामंदिरचे भाडे भरमसाट असल्याने तुलनेने नाटकाच्या तिकिटांचे दर मुंबई पुण्यापेक्षा जास्त आहेत.

त्यामुळे ८० टक्के सर्वसामान्य प्रेक्षक नाटक बघण्याचा आनंद घेऊ शकत नाही. नाट्यगृहाचे भाडे, तिकिटाचे दर अधिक असल्याने प्रेक्षक कमी असतात. बोटावर मोजण्याइतके कलावंत नाशिकमध्ये नाटकाचे प्रयोग करतात. सिडको, नाशिक रोड, सातपूर, इंदिरा नगर सारख्या भागात नाट्यगृहाची सोयच नसल्याने या भागात सांस्कृतिक प्रगती झाली नाही. (latest marathi news)

drama theater
Nashik BJP News : काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेश सरचिटणीस डॉ. तुषार शेवाळे यांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

पंचवटीतील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सभागृहावर स्मार्टसिटी अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून सभागृहाचे नूतनीकरण केले. त्याचे उद्घाटन होऊन तीन महिने उलटले तरी नाट्यगृहाचा पडदा अद्यापही न उघडलेला नाही. पद्मश्री दादासाहेब गायकवाड सभागृहाचे नूतनीकरण झाले परंतु साउंड सिस्टिम नाटकाला साजेशी नसल्याने तिथे नाटकाचे प्रयोग होऊ शकत नाहीत.

नाशिक रोडला बिटको चौकाजवळच्या कोठारी नाट्यगृहाला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. नाशिक रोड दसक, पंचक, एकलहरे भाग जोडला गेला आहे. परंतु, येथील नागरिकांना नाट्यगृहाची कोणतीही सोयच नाही. शहरातील कलावंत मालिका, चित्रपटात झळकतात पण त्यांना खरे व्यासपीठ मुंबई, पुणे शहरातून मिळते. नवीन पिढीने कला क्षेत्रात यायचे म्हटल्यास सांस्कृतिक क्षेत्राला तितकेसे पोषक वातावरण शहराला नसल्याचे जाणकार सांगतात.

नूतनीकरणाच्या प्रतिक्षेत पसा

पसा नाट्यगृह शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने प्रेक्षकांना येण्यासाठी सोयिस्कर ठरते. नाट्यगृहात सुविधांची वाणवा असल्याने व्यावसायिक नाटकांचे प्रयोग तिथे होत नाहीत. केवळ स्थानिक नाटक, एकांकिका आणि राज्य नाट्य हौशी स्पर्धा होतात. नूतनीकरणाबाबत रंगभूमी दिनी बैठक झाली. अंदाजे तीन कोटी खर्च अपेक्षित असून निधी मिळेपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

drama theater
Nashik NMC News : ‘पीटीसी’समोरील वादग्रस्त जागेवर मनपाचाच दावा; सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर

७५ नाट्यगृह, ५० कोटींचा निधी

शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात राज्यातील नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी निधी मंजूर झाला तर, राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी स्पर्धेला शुभेच्छा देताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या दोन वर्षांत राज्यात ७५ नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्याची घोषणा केली आहे. घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार याची वाट कलावंतांसह प्रेक्षकही बघत आहेत.

"नाशिकला फार मोठ्या नाट्यगृहांची आवश्यकता नाही. बॉक्स थिएटरसारखी २००-२५० प्रेक्षकांची मर्यादा असणारी नाट्यगृह शहराच्या विविध भागात अपेक्षित आहेत. यामुळे तिथे नाटकाचा खर्च, तिकिटांचे दर कमी राहतील. त्यातून मोठे नाटक घडण्यासाठी चालना मिळेल. एकांकिका, नाटकाच्या माध्यमातून नवनवीन कलाकार शिवाय प्रेक्षक घडतील." -सचिन शिंदे, नाट्य दिग्दर्शक (कुरळे केस)

"शहरात किमान चार नाट्यगृह अपेक्षित आहेत. शासनाकडून खेळाला जेवढे प्राधान्य दिले जाते, तेवढे महत्त्व नाट्यक्षेत्राला दिले जात नाही. जो निधी मंजूर केला जातो तो केवळ कागदावरच राहतो. दुर्दैवाने नाट्यक्षेत्र गौण मानले जाते. शालेय, महाविद्यालयीन स्तरावर नाटकाचे संस्कार झाले तर त्या कलाकारात आत्मविश्वास निर्माण होतो. पर्यायाने शहरात गुन्हेगारीचे प्रमाण घटते."- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, अ. भा. नाट्य परिषद (हिरवा शर्ट)

drama theater
Nashik ZP News : नाशिक जिल्हा परिषद निधी खर्चात अव्वल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.