Nashik Water Shortage : मालेगावात केवळ 6 टँकर घटले पाणीटंचाई कायम

Nashik News : पावसाळ्यातील मृग नक्षत्र संपले तरी तालुक्यातील बहुतांशी भागात गंभीर पाणीटंचाई कायम आहे. पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत.
Water Shortage
Water Shortageesakal
Updated on

मालेगाव : पावसाळ्यातील मृग नक्षत्र संपले तरी तालुक्यातील बहुतांशी भागात गंभीर पाणीटंचाई कायम आहे. पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. दहापैकी सौंदाणे, सायने व झोडगे मंडलात पावसाने मिलीमीटरमध्ये शंभरी ओलांडली आहे. काही भागात पेरण्यांची लगीनघाई सुरु आहे. असे असले तरी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व विहिरी कोरड्या आहेत. (Only 6 tankers reduced in Malegaon)

मृग नक्षत्रातील पावसामुळे ४९ पैकी केवळ सहा गावांमध्ये टँकर बंद झाले. तालुक्यात आजही ४३ गावे व ८८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी ५० टँकरच्या माध्यमातून ९८ फेऱ्या मारल्या जात आहेत. तालुका टॅंकरमुक्त होण्यासाठी दोन ते तीन मोठ्या पावसांची गरज आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात ऑक्टोबरपासूनच टँकर धावत होते.

उन्हाळा सुरु होताच टँकरची संख्या वाढत गेली. शासकीयबरोबरच सामाजिक व राजकीय नेत्यांकडून अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. एप्रिल- मे महिन्यात जवळपास निम्म्या तालुक्याची तहान टँकरने भागविली जात होती. पावसाळा सुरु होईपर्यंत ४९ गावे व ९८ वाड्यांना टँकर सुरु होते. ५५ टँकरच्या माध्यमातून गाव-वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात होता. मृग नक्षत्रात काटवनसह माळमाथ्यावर दमदार पाऊस झाला.

अनेक भागातील खरीपाच्या पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला. पुरेशा पावसामुळे तालुक्यातील झाडी, चिंचवे (गा.), काष्टी, निमशेवडी, अजंग सेक्शन सी व डोंगराळे या सहा गावांमधील टँकर बंद झाले. तालुक्यात सद्यस्थितीत ४३ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहेत. यात कजवाडे, सावकारवाडी, एरंडगाव, ज्वार्डी बुद्रुक, नगाव दिगर. (latest marathi news)

Water Shortage
Nashik Division Teachers Constituency Election: शिक्षक, शिक्षण अन शिक्षणसंस्थांना न्याय देणार : ॲड. संदीप गोपाळराव गुळवे

मेहुणे, घोडेगाव, टाकळी, शिरसोंडी, पोहाणे, निंबायती, दुंधे, लहान टिपे, मोठे टिपे, मोरदर, गारेगाव, निमगुले खुर्द, डुबगुले, गाळणे, नागझरी, लुल्ले, गुगुळवाड, अस्ताणे, जळकू, हाताणे, टोकडे, वळवाडी, नांदगाव बुद्रुक, काष्टी, कुकाणे, कंक्राळे या गावांना तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या ८८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

मालेगाव तालुक्यातील दहा मंडलांपैकी आतापर्यंत सर्वाधिक १३१.३ मिलीमीटर पाऊस कळवाडी मंडळात झाला आहे. सौंदाणे १२२.६, सायने ११९.९, झोडगे ११३.२, वडनेर ९९.७, मालेगाव ९७.५, करंजगव्हाण ९१.४, निमगाव ९५.७, तर दाभाडी मंडलात ८०.१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सर्वात कमी ३२.५ मिलीमीटर पाऊस कुकाणे मंडलात झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरी ९८.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

गेल्यावर्षी तीन महिने कडक ऊन पडले. उन्हाची तीव्रता पाहता पाणीपुरवठा योजनांचे जलस्त्रोत, विहिरी, तलाव, पाझर तलाव आदींमध्ये पाणीसाठा होण्यासाठी दोन-तीन मोठ्या पावसाची गरज आहे. आठवड्यापासून पावसाने पाठ फिरवली आहे. तालुक्यात किती दिवस टँकर धावतील हे भविष्यात होणाऱ्या पावसावर अवलंबून आहे.

सध्याची पाणीटंचाईची स्थिती

टंचाईग्रस्त गावे - ४३

टंचाईग्रस्त वाड्या - ८८

एकूण टँकर - ५०

एकूण फेऱ्या - ९८

गावांसाठी विहिरी अधिग्रहीत- ०८

टँकर भरण्यासाठी विहिरी अधिग्रहीत - ४४

Water Shortage
Nashik Monsoon News : पाऊस लांबल्‍याने नाशिककर चिंतातूर! पारा वाढून 33 अंशांवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.