Jal Jeevan Scheme : जलजीवनच्या 702 योजनांमधून केवळ पाणीपुरवठा सुरू! जूनअखेर 763 योजना पूर्ण

Nashik News : जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या योजनांना मार्च महिन्यात सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतर जूनअखेर एक हजार २२२ योजनांपैकी ८२१ योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते.
Jal Jeevan Scheme
Jal Jeevan Scheme esakal
Updated on

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या योजनांना मार्च महिन्यात सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतर जूनअखेर एक हजार २२२ योजनांपैकी ८२१ योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. प्रत्यक्षात ३० जूनअखेर जिल्ह्यातील ७६३ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. निश्‍चित केलेल्या उद्दिष्टांपैकी ५८ योजनांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, दुष्काळ यांचा फटका गत तीन महिन्यांत बसल्याने योजनांची कामांची गती कमी झाल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी ३१ जुलैअखेर ८२१ योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आता यंत्रणेला दिले आहे. त्यामुळे महिनाभरात ५८ योजना पूर्ण करण्याचे आवाहन विभागासमोर असणार आहे.

जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत एक हजार २२२ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. ३१ मार्च २०२४ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निश्चित केले होते; मात्र कामे सुरू होण्यास झालेला विलंब बघता सरकारने या योजना पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. शासनाने मुदत वाढविली असली तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मार्चअखेर ८२१ योजना पूर्ण करण्याची हमी शासन दरबारी दिली होती.

त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सतत पाठपुरावा सुरू होता. मात्र ठेकेदारांनी केलेल्या कामाच्या प्रमाणात देयके मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात झाल्याने विभागाने प्रयत्न करूनही ३१ मार्चपर्यंत निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. ३१ मार्चपर्यंत ८२१ पाणीपुरवठा योजनांपैकी ६१३ योजनांची कामे पूर्ण झाली. त्यामुळे विभागाने निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. (latest marathi news)

Jal Jeevan Scheme
Nashik Family Court : नाशिकला हवे आणखी एक कौटुंबिक न्यायालय! नाशिक बार कौन्सिलची उच्च न्यायालयाकडे मागणी

उद्दिष्ट पूर्ण नसली तरी एकूण एक हजार २२२ योजनांपैकी निम्या योजना पूर्ण करण्यात विभागाला यश मिळाले होते. त्यावेळी ३० जूनअखेर ८२१ योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. मात्र प्रत्यक्षात ३० जूनपर्यंत ही उद्दिष्टेही पूर्ण होऊ शकली नाहीत.

३० जूनपर्यंत भौतिकदृष्ट्या ७६३ योजना पूर्ण झाल्या असून, यातील ७०२ योजनांमधून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. जूनअखेरपर्यंत कामे पूर्ण होऊ न शकल्याने विभागाने आता ठेकेदारांना एक महिन्याची वाढीव मुदत देत, ३१ जुलैपर्यंत ८२१ योजनांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.

तीन महिन्यांत ४५९ योजना पूर्ण करण्याचे आवाहन

एक हजार २२२ योजना पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चची असलेली मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. यात ३० जूनपर्यंत केवळ ७६३ योजना पूर्ण झाल्या आहेत. ३१ जुलैअखेर ८२१ योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र आतापर्यंत निश्चित केलेले उद्दिष्टे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे विभागासमोर तीन महिन्यांत एकूण ४५९ योजना पूर्ण करण्याचे आवाहन आहे.

Jal Jeevan Scheme
Nashik Parking Problem : फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की पार्किंगसाठी? पादचारी रस्त्यावर; कारवाईच्या धाकाने फुटपाथवर पार्किंग

जूनअखेर पूर्ण झालेल्या योजना

तालुका मंजूर योजना ३१ मार्चअखेर पूर्ण झालेल्या योजना ३० जून पूर्ण झालेल्या योजना प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झालेल्या योजना

पेठ ८५ ४० ४५ ४५

त्र्यंबकेश्वर ८५ ४० ४१ ४१

चांदवड ७४ २५ ३५ २४

सुरगाणा १६४ ७१ ८९ ८४

सिन्नर ८० ३५ ४१ ३२

नाशिक ५५ २५ ४२ ४५

देवळा ३३ २० २३ १६

मालेगाव ५५ ४१ ४३ ३९

दिंडोरी १०४ ६० ७३ ६५

कळवण १२७ ८० ८३ ६३

बागलाण ११२ ५३ ६० ६६

इगतपुरी ९१ ४५ ५६ ५५

निफाड ९५ ७५ ८५ ८३

येवला ३६ २० २१ २१

नांदगाव २६ २३ २४ २३

एकूण १,२२२ ६५३ ७६३ ७०२

Jal Jeevan Scheme
Nashik Teacher Constituency Result : विवेक कोल्हे, गुळवेंना आपसातील मतविभाजनाचा फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.