SAKAL EXCLUSIVE: स्मशानभूमीअभावी 413 गावांत उघड्यावर अंत्यसंस्कार; आदिवासी तालुक्यातील गावांची संख्या मोठी

SAKAL : स्मशानभूमी ही गावची मूलभूत गरज आहे. मात्र, जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ४१३ गावे अद्यापही स्मशानभूमीपासून वंचित असल्याचे समोर आले आहे.
sakal exclusive
sakal exclusivesakal
Updated on

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

SAKAL EXCLUSIVE : स्मशानभूमी ही गावची मूलभूत गरज आहे. मात्र, जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ४१३ गावे अद्यापही स्मशानभूमीपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. या गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अथवा माळरानावर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की गावातील ग्रामस्थांवर येत आहे. यात सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी तालुक्यांतील गावांची संख्या मोठी आहे. (nashik Open cremation in 413 villages due to lack of graveyard marathi news)

जनसुविधा निधीतून स्मशानभूमीसाठी कमी निधी प्राप्त झाल्याने आता निधी पुनर्नियोजनातून स्मशानभूमी नसलेल्या गावांसाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधांतर्गत स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध होता. मात्र, जिल्ह्यातील आमदार, खासदार हे स्मशानभूमीऐवजी स्मशानभूमींशी आनुषंगिक कामे देत ठेकेदारांना पोसण्यात धन्यता मानतात.

त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी देखील गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचे वास्तव आहे. गावात स्मशानभूमी नसल्याकारणाने पावसाळ्यात अनेक गावांमध्ये तात्पुरता निवारा करून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागल्याची नामुष्की येते. काही महिन्यांपूर्वीच जिल्ह्यात ४६१ गावांमध्ये स्मशानभूमी शेड नसल्याने तेथील नागरिकांना उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे वास्तव ‘सकाळ’ने समोर आणले होते.

त्याचवेळी सुरगाणा तालुक्यातील गुजरात हद्दीलगतच्या काही गावांमध्ये विकासकामांबाबत दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी गुजरात राज्यात जोडण्याचा मुद्दा गाजला. त्या वेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक घेत जिल्हा परिषदेला सुरगाण्यातील समस्यांचा आराखडा मागविला. यात केवळ सुरगाण्यातील १२२ गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचे निदर्शनास आले होते. (latest marathi news)

sakal exclusive
Nashik News : मखमलाबाद रोडवर रस्त्यालगतच्या बाजारामुळे वाहतुकीस अडथळा

त्याचवेळी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने त्या वेळी जिल्हा नियोजन समितीला पत्र पाठवून जिल्ह्यातील ४६१ गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याची गावनिहाय यादी पाठविली होती. परंतु, गत वर्षी पालकमंत्र्यांनी नवीन स्मशानभूमीच्या केवळ दहा कामांना मंजुरी दिली. यंदाच्या जिल्हा नियोजन समितीला जनसुविधांसाठी २९ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

या निधीतून पालकमंत्र्यांनी २७४ कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. या कामांपैकी ३९ कामे नवीन स्मशानभूमींची आहेत. उर्वरित २५२ कामे ही आधी अस्तित्वात आलेल्या स्मशानभूमींशी आनुषंगिक आहेत. जनसुविधानंतर पुन्हा काही गावांना स्मशानभूमीसाठी निधी प्राप्त झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील एक हजार ९०० गावांपैकी ४१३ गावांत अद्यापही स्मशानभूमी नाही.

तालुकानिहाय स्मशानभूमी नसलेली गावे

नाशिक (तीन), इगतपुरी (२८), त्र्यंबकेश्वर (६२), पेठ (५२), सुरगाणा (११४), दिंडोरी (सात), कळवण (६७), देवळा (सहा), बागलाण (३३), चांदवड (चार), मालेगाव (सात), नांदगाव (दहा), येवला (सहा), निफाड (पाच), सिन्नर (नऊ).

sakal exclusive
Nashik News : मोफत उपचारांसाठी कुणालाही पैसे देऊ नका : जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.