Nashik News : विरोधकांवर विनयभंगाचा गुन्हा होता होता राहिला! सत्ताधाऱ्यांना विरोधकांची मात

Nashik News : निवडणुका म्हटलं, की आरोप-प्रत्यारोप आलेच. एकमेकांचा वचपा काढण्यासाठी सत्ताधारी व विरोधक नेहमीच तत्पर असतात.
Rally
Rally esakal
Updated on

Nashik News : निवडणुका म्हटलं, की आरोप-प्रत्यारोप आलेच. एकमेकांचा वचपा काढण्यासाठी सत्ताधारी व विरोधक नेहमीच तत्पर असतात. काहीजण बहाणा शोधतात, तर काहीजण संधीचं सोनं कसं करता येईल ते बघतात. असाच काहीसा प्रकार नुकताच नाशिक परिसरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडला आणि संपूर्ण नाशिक शहरामध्ये एकच चर्चा झाली. (Nashik News)

नुकतीच नाशिक लोकसभा उमेदवाराची एका ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली. रॅली म्हटलं, की कार्यकर्त्यांचा जल्लोष... त्यात विरोधकाच्या घर किंवा कार्यालयाजवळून आपली रॅली कशी जाईल, अशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा असते. पोलिसांनाही अशा परवानग्या देताना पार नाकीनऊ येते. परंतु प्रेशर आलं, की त्यांचा नाइलाज होतो.

अशाच एका निघालेल्या रॅलीत देखील असंच काही घडलं. इजा, बिजा अशा दोन ठिकाणी वादविवाद होता होता राहिला. मात्र तिजा म्हणजे तिसऱ्या ठिकाणी जेव्हा ही रॅली आली तेव्हा मात्र हा संघर्ष टळला नाही. विरोधकांना नेमके आयते कोलीत मिळालं. त्यांनी या संधीचं सोनं करत थेट पोलिस ठाणे गाठत समोरच्यांवर गुन्हाच दाखल केला.

वास्तविक पाहता, ही नोंद अदखलपात्र झाली पाहिजे होती, अशी तक्रारदार व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. सत्तेत असतानाही आपल्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांनी देखील रात्री राज्य प्रवक्त्यांच्या फौजफाट्यासह पोलिस ठाणे गाठले. (latest marathi news)

Rally
Nashik News : पंचायत विकास निर्देशांक संकलनात नाशिक जिल्हा अव्वल! माहितीची 100 टक्के पडताळणी करून माहिती शासनाला सादर

पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये थयथयाट केला. वरिष्ठांनाही चांगलाच घाम फुटला. कार्यालयाबाहेर त्यांनी येत वरिष्ठांशी फोनवरून संवाद साधला. तेव्हा कोठे साधा तक्रार अर्ज घेतला. फोटो सेशन व बाईट देत आपण विजयी पताका फडकावली, असा आविर्भाव आणत गाड्यांचा ताफा बाहेर पडला. सर्वत्र चर्चा झाली, की आता आम्ही देखील गुन्हा दाखल करणार. मेसेजही गेला.

मात्र रात्र संपली अन् दिवस उजाडला. परत रात्र झाली; परंतु अखेर तो विनयभंगाचा गुन्हा काही दाखल करता नाही आला. कुणी म्हणे विरोधक पुरून उरले, तर कुणी म्हणे वरून सूत्र हलविले. तर कुणी म्हणे तक्रारदारांनी अर्ज मागे घेतला. थोडक्यात काय, सत्ताधाऱ्यांचा फुसका बार निघाला तर विरोधक मात्र पुरून उरले.

Rally
Nashik News : ठाकरे गटातील निफाडचे 5 पदाधिकारी नजरकैदेत! पंतप्रधानांच्या सभेपूर्वी पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.