Nashik Police: खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीची संधी! इच्छुकांची घेतली जाणार परीक्षा; 28 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Nashik News : सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येऊन त्यानुसार पदोन्नतीने उपनिरीक्षकपदी बढती दिली जाणार आहे.
PSI promotion
PSI promotion esakal
Updated on

Nashik Police : महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त असलेल्या राखीव पोलीस उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत पदोन्नतीसाठीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने येत्या २८ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येऊन त्यानुसार पदोन्नतीने उपनिरीक्षकपदी बढती दिली जाणार आहे. (Opportunity for promotion to PSI under Department Call for applications till 28)

महाराष्ट्र पोलीस दलातील प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र पोलीस दलातील राखीव पोलीस उपनिरीक्ष या पदाच्या रिक्त १०० जागांसाठी पोलीस दलातील हवालदारांना पदोन्नतीची संधी उपलब्ध झाली आहे.

पोलीस दलातील इच्छुक पोलीस हवालदारांना येत्या २८ ऑगस्टपर्यंत पोलीस आयुक्तालय वा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करीत असताना जर पोलीस हवालदार प्रतिनियुक्तीवर असले तर त्यास मूळ ठिकाणी यासाठी अर्ज सादर करावा लागणर आहे.

(latest marathi news)

PSI promotion
Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल

परिक्षेत्रांवर परीक्षा

राखीव पोलीस उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, गडचिरोली या राज्यातील पोलीस परिक्षेत्रांवर घेतली जाणार आहे.

या परीक्षेत उमेदवारांना १०० गुणांची लेखी, २०० गुणांची प्रात्यक्षिक चाचणी द्यावी लागणार आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे. तसेच, निकालातील गुणवत्ता यादीनुसार पदोन्नती दिली जाणार आहे. कवायत मार्गदर्शक किंवा राखीव पदांसाठी इच्छुक असलेल्यांनी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.

यांना आहे संधी

पोलीस सेवेमध्ये कार्यरत आणि हवालदार या पदावर ३० एप्रिल २०२४ पर्यंत ४ वर्षे सेवा पूर्ण असणार्या इच्छुकांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. पुरुष व महिला हवालदारांसाठी एकत्रितच परीक्षा घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे, गार्डड्युटी, सेंट्री ड्युटी, बिग्युलर, प्रशिक्षण केंद्र, नक्षलग्रस्त भाग, राज्य राखीव पोलीस दल या ठिकाणी सलग चार वर्षे सेवा असलेल्यांनाही या संधी लाभ घेता येणार आहे.

PSI promotion
Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.