मालेगाव शहर : राज्यात विद्यार्थ्यांना पूरक वाचनासाठी समग्र शिक्षणाच्या ग्रंथालय उपक्रमात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण पुस्तकांची निर्मिती करण्यात येणार आहे. विविध संकल्पनांवर, शालेय स्तर व वर्ग गटनिहाय मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषांतील पुस्तके तयार करण्यासाठी शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लेखन करण्याची संधी मिळणार आहे. अंतिम निवड झालेल्या पुस्तक राज्यातील ६५ हजार शाळांमध्ये पाठवण्यात येणार आहेत. (Nashik Opportunity for teachers to produce books)