Nashik Police Recruitment : महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त शिपाई पदांसाठी राज्यात भरतीसाठी अर्ज दाखल केलेल्यांची मैदानी चाचणी सुरू आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फेही ११८ रिक्त जागांसाठी गेल्या १९ तारखेपासून मैदानी चाचणी घेतली जात असून शनिवारी (ता. २९) ही प्रक्रिया संपणार आहे. परंतु या दरम्यान उमेदवारास काही कारणास्तव मैदानी चाचणीला उपस्थित राहाता आलेले नाही.
अशा उमेदवारांनी रविवारी (ता. ३०) सकाळी ६ वाजता पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे अनुस्थित राहिलेल्यांना एक संधी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे देण्यात आलेली आहे. (opportunity for those absent from Police Recruitment will conduct field test on Sunday)
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे १९ ते २९ जून या दरम्यान अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. या प्रक्रियेला अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. मात्र या दरम्यान, काही उमेदवारांना काही कारणास्तव मैदानी चाचणीला बोलावूनही त्यांना येता आलेले नाही. अशा उमेदवारांसाठी शहर पोलीस आयुक्तालयाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
मैदानी चाचणीला अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी येत्या रविवारी (ता.३०) सकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअम याठिकाणी उपस्थित राहावयाचे आहे. यासंदर्भात या उमेदवारांनी लेखी अर्ज योग्य त्या पुराव्यासह सोबत आणावा, तसचे, येताना कॉललेटर, अर्ज, सहा पासपोर्ट फोटो, आधारकाड आणि आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणण्याचे आवाहन आयुक्तालयातर्फे करण्यात आलेले आहे.
महिलांच्या मैदानी चाचणी
शहर आयुक्तालयाच्या रिक्त पदासाठी सुरू असलेल्या भरतीच्या मैदानी चाचणीत गुरुवारी (ता. २७) ७५० महिला उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी २३१ महिला उमेदवार अनुपस्थित होते. तर, ५१९ उपस्थित उमेदवारांपैकी ४३४ उमेदवार पात्र ठरले आहेत. ८५ उमेदवार अपात्र ठरले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.