Crop Insurance : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत 15 जुलैपर्यंत सहभागाची संधी

Nashik News : शासनाने एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा खरीप हंगाम २०२४-२५ या वर्षासाठी लागू केली आहे.
Crop Insurance
Crop Insurance esakal
Updated on

नाशिक : शासनाने एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा खरीप हंगाम २०२४-२५ या वर्षासाठी लागू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीकविमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करून १५ जुलैपर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

पीकविमा योजनेत भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही सहभाग नोंदवू शकतात. त्यासाठी नोंदणीकृत भाडेकरार पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. आपले सरकार सुविधा केंद्र (सीएससी) धारकास पीकविमा कंपनीमार्फत प्रतिअर्ज रक्कम ४० रुपयांप्रमाणे रक्कम अदा करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही.

भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफुल, सोयाबीन, कपाशी, खरीप कांदा आदी अधिसूचित पिके मंडळ व तालुका स्तरावर पीकविमा भरण्यास पात्र आहे. पीकविमा भरताना ऑनलाइन सेवा केंद्रचालकांनी व आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी शेतकऱ्यांच्या नावात आधारकार्ड. (latest marathi news)

Crop Insurance
Nashik News : सप्तशृंगी गडावरील शीतकड्यावरुन उडी घेत महिलेने संपवलं जीवन

सातबारा व बँक पासबुक आदी कागदपत्रांवर किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरून घ्यावा. त्याचप्रमाणे विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांच्या नावातील दुरुस्ती करून घेण्याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे. तसेच, जर शेतकऱ्याच्या नावात पूर्णतः बदल असेल तर अशा शेतकऱ्यांचा विमा भरून घेऊ नये.

कारण, विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधारकार्डशी जे बँक खाते लिंक आहे, अशा खात्यावरच नुकसान भरपाई जमा होणार आहे. त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील, आधारकार्डवरील व सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Crop Insurance
Nashik Monsoon Dealey : जून सरला तरी धरणे कोरडीठाक! दिंडोरी तालुक्यातील चित्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.