Nashik News : महात्मानगरच्या प्रस्तावित जलकुंभाला विरोध! नागरिक एकवटले

Nashik News : महात्मानगर येथे अस्तित्वात असलेला जलकुंभ पाडून त्या जागेवर नवीन जलकुंभ बांधण्याऐवजी याच भागात खड्ड्यात असलेल्या उद्यानाच्या जागेत जलकुंभ उभारला जाणार आहे
City President of NCP Ranjan Thackeray giving a statement to The Commissioner Dr. Ashok Karanjkar
City President of NCP Ranjan Thackeray giving a statement to The Commissioner Dr. Ashok Karanjkar esakal
Updated on

नाशिक : महात्मानगर येथे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसलेल्या जागेवर जलकुंभ उभारून सध्या अस्तित्वातील जागेत बीओटी प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जात असल्याच्या चर्चेने स्थानिक नागरिक एकवटले. महापालिका आयुक्तांना निवेदन देत संताप व्यक्त केला. (Nashik Mahatmanagars proposed Jalakumbh marathi news)

महात्मानगर येथे अस्तित्वात असलेला जलकुंभ पाडून त्या जागेवर नवीन जलकुंभ बांधण्याऐवजी याच भागात खड्ड्यात असलेल्या उद्यानाच्या जागेत जलकुंभ उभारला जाणार आहे. दोन दिवसांपासून उद्यानात जलकुंभ उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. नागरिकांनी विचारपूस केल्यानंतर ही बाब उघड झाली.

अस्तित्वातील जलकुंभ ज्या जागेवर आहे, ती जागा योग्य आहे. परंतु सदर जागा रस्ता सन्मुख असल्याने त्या जागेवर बीओटीवर इमारत उभारण्याचा घाट घातला जात आहे. त्याशिवाय जलकुंभाच्या बाजूला असलेल्या दहा वर्षांपूर्वी बांधलेले महापालिकेचे शॉपिंग कॉम्प्लेक्स पाडले जाणार असल्याच्या चर्चेने नागरिकांच्या संतापात अधिकच भर पडली.

स्थानिक नागरिकांनी गुरुवारी (ता. २९) सकाळी एकत्र येत संताप व्यक्त करत प्रस्तावित जलकुंभ उद्यानात उभारण्यास विरोध केला. त्यासंदर्भात आयुक्त डॉ. करंजकर यांना निवेदन दिले. महात्मानगर भागातील प्रियांका, सत्यजित, सुवर्णकलश व दामोदर अपार्टमेंट, प्रियांका प्राइड व अन्य इमारतीतील रहिवाशांनी एकत्र येत विरोध केला आहे. (Latest Marathi News)

City President of NCP Ranjan Thackeray giving a statement to The Commissioner Dr. Ashok Karanjkar
Loksabha Elections: Navneet Rana Amravati मधून, Shrirang Barne Maval मधून कमळावर निवडणूक लढवणार?

येथील गो. ह. देशपांडे उद्यानात उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाला रहिवाशांनी विरोध केला. उद्यानात जलकुंभ झाल्यास नागरिक मानसिक तणावात येतील असा दावा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, माजी नगरसेवक माणिक सोनवणे, समीर सोनवणे, सुशील उत्तरवार यांनी रहिवाशांच्या वतीने निवेदन दिले.

तांत्रिकदृष्ट्या अयोग्य

सध्या महात्मानगर रस्ता सन्मुख असलेला जलकुंभ पाण्याचा समप्रमाणात दाब ठेवण्यासाठी योग्य आहे, परंतु उद्यानात जलकुंभ उभारल्यास कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्याचबरोबर शासन नियमानुसार एखाद्या ले- आउटमध्ये ओपन स्पेस असेल तर स्थानिक नागरिकांच्या संमतीशिवाय कोणतेही प्राधिकरण नागरिकांच्या विरोधात बांधकाम करू शकत नाही.

असे असतानाही जलकुंभ उभारला जात असल्याने या तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे नागरिकांनी विरोध केला आहे. महात्मानगर जलकुंभाच्या बाजूला मोकळी जागा असल्याने तेथे जलकुंभ उभारावा, असेही सुचविले आहे.

City President of NCP Ranjan Thackeray giving a statement to The Commissioner Dr. Ashok Karanjkar
Bogus Disability Certificate Case: `त्या’ वादग्रस्त अधिकाऱ्यांची पदोन्नतीही अडचणीत येणार! अद्याप गुन्हा नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.