Nashik Rain Orange Alert : जिल्ह्यात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट! शहरात 10.2 मिमी पाऊस, रात्री विजांच्‍या कडकडाटासह बरसला

Latest Rain Update News : दिवसभरात १०.२ अंश सेल्सिअस पावसाची नोंद झाली आहे. दरम्‍यान पुढील दोन दिवस गुरुवार (ता.२६) पर्यंत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून, पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
Rain Orange Alert
Rain Orange Alertesakal
Updated on

Nashik Rain Orange Alert : परतीच्‍या पावसाने जिल्‍हा सर्वदूर व्‍यापला असून, शहरी भागातही मुसळधार सुरु आहे. मंगळवारी (ता.२४) दुपारपासून सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत काही वेळेच्या अंतराने बरसत राहिला.

रात्री दहाच्‍या सुमारास विजांच्‍या कडकडाटासह पाऊस बरसला. दिवसभरात १०.२ अंश सेल्सिअस पावसाची नोंद झाली आहे. दरम्‍यान पुढील दोन दिवस गुरुवार (ता.२६) पर्यंत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून, पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. (Orange alert for next two days in district)

गेल्‍या काही दिवसांपासून परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. पुढील तीन-चार दिवस राज्‍यात बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस बरसणार असल्‍याचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला होता. अंदाजाप्रमाणे गेल्‍या दोन दिवसांपासून शहरी भागात सातत्‍याने ढगाळ वातावरण राहात आहे. तसेच काही अंतराने पाऊस हजेरी लावत आहे.

मंगळवारी (ता.२४) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. परंतु दुपारपर्यंत पाऊस बरसला नव्‍हता. साधारणतः दोनच्‍या सुमारास पावसाला सुरवात झाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये पावसाचा वेग वाढल्‍याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. अर्धा तासाच्‍या हजेरीनंतर पुन्‍हा पावसाने विश्रांती घेतली. दुपारी चारनंतर पुन्‍हा रिपरिप पाऊस सुरु झाला. (latest marathi news)

Rain Orange Alert
Kolhapur : लोखंडी सळई गळ्यातून आरपार गेल्याने मजुराचा दुर्दैवी अंत; विसरलेला मोबाईल घेण्यासाठी आला अन्..

दरम्‍यान रात्री दहाला शहरासह उपनगरीय भागांमध्ये ढगांचा गडगडाट होऊ लागला. विजांच्‍या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत बहुतांश भागांमध्ये पाऊस सुरु राहिला. सकाळी साडे आठ ते रात्री साडेपाच या वेळेत १०.२ अंश पावसाची नोंद घेतली आहे. तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस व कमाल तापमान ३०.० अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

हवामानखात्‍याच्‍या सूचना अशा..

भारतीय हवामानखात्‍याच्‍या अंदाजानुसार बुधवारी (ता.२५) आणि गुरुवारी (ता.२६) नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असेल. तर शुक्रवारी (ता.२७) नाशिकला येलो अलर्ट दिला आहे. त्‍यामुळे पुढील तीन दिवस तरी परतीच्‍या पावसाचा मुक्‍काम शहरासह जिल्‍हाभरात राहणार आहे.

Rain Orange Alert
Onion Import: दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानचा कांदा आयात! पंजाबमध्ये 11 मालट्रकद्वारे दाखल; महाराष्ट्रात संतापाची लाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.