Nashik Monsoon : जिल्ह्यात आज ऑरेंज, उद्या यलो अलर्ट; पाऊस कायम राहिल्यास धरणातून आज विसर्ग

Nashik Monsoon : शनिवारी जिल्ह्यातील काही भागांना पावसाने जोरदार झोडपले असताना रविवारी (ता. ४) ही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
Nashik Gangapur Dam
Nashik Gangapur Damesakal
Updated on

Nashik Monsoon : शनिवारी जिल्ह्यातील काही भागांना पावसाने जोरदार झोडपले असताना रविवारी (ता. ४) ही पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्यात पुणे, सातारा व पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केले असले, तरी नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या अलर्टनुसार जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच, सपाट भूभागातही जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Orange alert in district today rain continues discharge from dam today )

सध्याच्या अहवालानुसार सोमवारी (ता. ५) नाशिक जिल्ह्यात यलो अलर्ट असेल. यादिवशीही घाटमाथ्याच्या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे पुढील तीन-चार दिवस पावसाचा जिल्ह्यात मुक्काम राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण व परिसरामध्ये मागील २४ तासांपासून पावसाची सतत धार असल्याने धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांपर्यंत पोचली आहे. पावसाची अशी स्थिती कायम राहिल्यास रविवार दुपारनंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धारणा व मुकणे धरणाच्या पाणी पातळीतदेखील मोठी वाढ झाली असून, मुकणेमध्ये ४१ टक्के, तर दारणा धरण ८६ टक्के भरले आहे. (latest marathi news)

Nashik Gangapur Dam
Nashik Monsoon News : इगतपुरी तालुक्यावर पावसाची मेहेरबानी; भावली, दारणातून विसर्ग

मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने नाशिककरांवर पाणीटंचाईचे संकट घोंगावले होते. ६२०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी असताना जलसंपदा विभागाकडून ५११३ दशलक्ष घनफूट आणि आरक्षित करण्यात आले. त्यामुळे जवळपास १८ दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल होता. २२ जूनपासून शहर व परिसरात पावसाला सुरवात झाली. आतापर्यंत तुरळक पाऊस होता, मात्र मागील २४ तासांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला. परिणामी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

गंगापूर धरणातून मुख्यत्वे त्र्यंबकेश्वर तालुक्यात पडलेल्या पावसाचे पाणी साचते. त्र्यंबकेश्वर भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणाची पाणीपातळीदेखील वाढली आहे. सद्यःस्थितीत गंगापूर धरणात जवळपास ७० टक्के पाणी साचले आहे. पावसाची संततधार अशीच कायम राहिल्यास गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला जाणार आहे. त्यातून गोदावरीला मागील दीड वर्षात पहिलाच पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोदाकाठी सतर्कतेच्या सूचना

गंगापूर धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. ७८ टक्के पाणी झाल्यास धरणातून पाणी सोडले जाईल. धरणातून पाणी सोडल्यानंतर वेगाने पाण्याचा विसर्ग होईल. पुढे गोदाकाठच्या गावे तसेच दुकानांना पुराचा धोका संभवतो. त्यामुळे सततच्या पावसामुळे गोदाकाठी वास्तव्य करणाऱ्या नागरिक तसेच दुकानदारांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, दारणा धरणात सद्यःस्थितीत ६११३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे, तर मुकणे धरणात २९३६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गंगापूर धरणात ३८९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

Nashik Gangapur Dam
Nashik Monsoon Season : समाधानकारक पावसामुळे शेतमजुरांना रोजगार! मालेगाव तालुक्यात निंदणी, खुरपणी, फवारणीची लगबग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.