नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातूनच नव्हे तर परजिल्ह्यातूनही येणाऱ्या रुग्णांच्या नातलगांना काही सेवाभावी संस्थांकडून भोजन उपलब्ध करून दिले जाते. मात्र यापुढे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अन्नदान करण्यास जिल्हा शल्यचिकित्सकांनी मनाई केली आहे. या आदेशाबाबत अन्नदान करणाऱ्या सेवाभावी संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Order of District Surgeon prohibiting food donation in Civil hospital )