Maha E-Seva Kendra : ई-सेवा केंद्रातील सेवांचे दर फलक लावण्याचे तहसीलदारांचे आदेश!

Nashik News : महा-ई-सेवा केंद्र संचालकांनी दर्शनी भागात विविध योजनांच्या नोंदणीसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काचे दर केंद्रातील दर्शनी भागात लावावी असे आदेश सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी बजावले.
Maha E-Seva Kendra
Maha E-Seva Kendraesakal
Updated on

सिन्नर : महा-ई-सेवा केंद्र संचालकांनी दर्शनी भागात विविध योजनांच्या नोंदणीसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काचे दर केंद्रातील दर्शनी भागात लावावी असे आदेश सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी बजावले आहेत. याबाबत सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी तहसीलदार देशमुख यांच्याकडे याबाबतची मागणी केली होती. (Maha E-Seva Kendra)

सरकारने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे दर आकारणी करावी, दलाचे फलक केंद्र बाहेर लावण्यात यावे. बहुअंतशी ठिकाणी ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर घेतले जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आदेश तहसीलदार देशमुख यांनी बजावले आहेत.

राज्य व केंद्र सरकारच्या सर्वोच्च योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाते. केंद्राबाहेर दर फलक नसल्याने ई-सेवा केंद्र संचालकाकडून मनमानी दर घेऊ नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार भाऊसाहेब बैरागी यांनी केली होती. (latest marathi news)

Maha E-Seva Kendra
Nashik News : मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; देवळा तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंता

दर दर्शनी भागात लावण्याचे आदेश व दरापेक्षा अधिक पैसे घेताना आढळल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाऊसाहेब बैरागी यांनी केली होती व त्यास तहसीलदार यांनी मान्यता दिली.

Maha E-Seva Kendra
Nashik News : लोणच्यांनी घातली खवय्यांना भुरळ; मालेगावच्या बाजारात ग्राहकांकडून पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com