Nashik News : लासलगाव येथे अनाथ गौरीचा विवाह थाटात; जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमातील 105 वी लेक

Nashik : लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमातील बहुरूपी बाबा व पालक संगीता व दिलीप गुंजाळ याला अपवाद ठरले.
Gauri and Swapnil got married.
Gauri and Swapnil got married.esakal
Updated on

Nashik News : मुलीच्या जन्मापासून लग्नापर्यंत खर्च करत लग्न लावून देत तिची सासरी पाठवणी करायची यामुळे अनेक पालक मुलगी नको रे बाबा, असे म्हणत मुलीच्या जन्माला नाकारतात. मात्र लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमातील बहुरूपी बाबा व पालक संगीता व दिलीप गुंजाळ याला अपवाद ठरले. (Nashik Orphan Gauri gets married in Lasalgaon marathi news)

त्यांनी आतापर्यंत अनाथ आश्रमातील १०४ मुलींचे लग्न लावून दिले तर गुरुवारी (ता.१८) लासलगाव जवळील पाचोरे येथील वाल्मीक सांगळे यांचा मुलगा स्वप्नील याच्याशी अनाथ गौरीचा थाटात विवाह लावला. यामुळे १०५ व्या लेकीचा विवाह झाला. या अनोख्या विवाहासाठी शेकडोंच्या संख्येने वऱ्हाडीही उपस्थित होते. यावेळी या वऱ्हाडी मंडळीने पालक दिलीप गुंजाळ व माता पालक संगीता गुंजाळ यांचे कौतुकही केले.

पाच वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी देवाची येथील राजू सोनेकर व त्यांची पत्नीचे अपघाती निधन झाले. यावेळी गौरी ही अनाथ झाली. घरात कोणीही सांभाळणारे नसल्याने एका नातेवाइकाने लासलगाव येथे जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमात आणून पोहच केली. त्यावेळी गौरी ही आठवीत शिक्षण घेत होती. गौरीचे गुंजाळ दांपत्याने मातापित्याप्रमाणे सांभाळ करत तिचे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.(latest marathi news)

Gauri and Swapnil got married.
Nashik News : मेकॅनिकल गेटवरून ‘स्मार्टसिटी’ ची कोंडी; माजी अभियंत्यांना विभागीय आयुक्तांसमोर हजर राहण्याची वेळ

ती अठरा वर्षांची पूर्ण होताच वर शोधला आणि थाटामाटाने लग्न लावून देत जबाबदारी पार पाडली. आशीर्वाद देण्यासाठी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक होळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश पाटील, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष अरविंद देसाई, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब होळकर, संदीप उगले, प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे, महिला दक्ष समितीच्या अध्यक्षा वेदिका होळकर आदी उपस्थित होते.

''समाजाने आदर्श घ्यावा असा विवाह समारंभ होता. ज्या मुलीच्या डोक्यावरचे मातृ-पितृ छत्र हरपले होते तरीही समाजाला निश्चित दिशादर्शक ठरेल, असा विवाह सोहळा आनंदात झाला. याबाबत अनाथ आश्रमाचा सार्थ अभिमान आहे.''- वेदिका होळकर (अध्यक्षा, महिला दक्ष समिती, लासलगाव)

Gauri and Swapnil got married.
Nashik News : नासर्डी पुलावर संरक्षक कठड्यास लागेना मुहूर्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.