Nashik Lok Sabha Election : परराज्यातील ‘होमगार्ड’ बंदोबस्तासाठी येणार! सेक्टर अधिकाऱ्यांकडून ‘बुथ’वर नजर

Lok Sabha Election : शुक्रवारी (ता. १७) सायंकाळपर्यंत परराज्यातून सुमारे एक हजार होमगार्ड दाखल होती. गोंदियातून सीआरपीएफच्या दोन तुकड्याही दाखल होत आहे.
Police
Policeesakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघातील पोलिस यंत्रणेची सज्जता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शुक्रवारी (ता. १७) सायंकाळपर्यंत परराज्यातून सुमारे एक हजार होमगार्ड दाखल होती. गोंदियातून सीआरपीएफच्या दोन तुकड्याही दाखल होत आहे. तसेच, शहरातील मतदान केंद्रांच्या बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आलेल्या सेक्टर अधिकाऱ्यांकडून केंद्रांची वारंवार पाहणी केली जात आहे. (Nashik Lok Sabha Election)

नाशिक लोकसभा मतदार संघासाठी २० तारखेला मतदान होत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर जादा पोलिस बंदोबस्त मागविण्यात आलेला आहे. तसेच, परराज्यातून जादा होमगार्डस्‌ही मागविण्यात आलेले आहे. मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातून एक हजार होमगार्डस्‌ शहरात बंदोबस्तासाठी येणार आहेत.

या होमगार्डस्‌ला घेण्यासाठी बसेस रवाना करण्यात आल्या असून, त्या शुक्रवारी (ता. १७) रात्रीपर्यंत नाशिकमध्ये दाखल होतील. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नेते मंडळी येत असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रांची तयारी सुरू आहे.

शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून मतदान केंद्रनिहाय पोलिस बंदोबस्ताची आखणीही निश्चित झाली आहे. शहरातील १२२७ मतदान केंद्रांची जबाबदारी पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. (latest marathi news)

Police
Nashik Unseasonal Rain : कांदा शेड, विजेचे पोल जमीनदोस्त; येवल्यात वळिवाच्या पावसाचा तडाखा

या सेक्टर अधिकाऱ्यांकडे निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची पाहणी करून बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे. मतदान केंद्र परिसरात सातत्याने गस्त पोलिसांकडून केली जात आहे.

सीआरपीएफ आज होणार दाखल

मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर अंबड औद्योगिक वसाहतीतील शासकीय गोदामात इव्हीएम मशिन ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सीआरपीएफच्या दोन तुकड्यांचा बंदोबस्त असणार आहे.

या दोन तुकड्या गोंदियातून शुक्रवारी (ता. १७) दाखल होतील. याशिवाय एसआरपीएफच्या पाच तुकड्या दाखल झाल्या असून, चार तुकड्या या आयुक्तालयाच्या चार विभागांच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्तात सहभागी होतील तर एक तुकडी आयुक्तालयात राखीव असणार आहे.

Police
Nashik NMC News : पावसाळापूर्व कामाचा अहवाल सादर करा! आयुक्तांच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.