Students Survey : निफाड, सटाण्यात 32 शाळाबाह्य मुले! सर्वेक्षण मोहिमेचा उद्या अंतिम दिवस

Nashik News : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शाळाबाह्य सर्वेक्षण मोहिमेत आतापर्यंत ३२ मुले शिक्षणापासून दूर असल्याचे आढळले आहे.
Nashik ZP News
Nashik ZP Newsesakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शाळाबाह्य सर्वेक्षण मोहिमेत आतापर्यंत ३२ मुले शिक्षणापासून दूर असल्याचे आढळले आहे. यात निफाड तालुक्यातील ३०, तर बागलाण तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (out of school survey campaign being implemented through Zilla Parishad)

या मोहिमेचा शनिवार (ता. २०) हा अंतिम दिवस आहे. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी गुरुवारी (ता. १८) गटशिक्षणाधिकारी, समन्वयांचा आढावा घेतला. यात मोहिमेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. जिल्ह्यात अनेक तालुक्यांत रोजगारानिमित्त कुटुंब स्थलांतरित होतात.

वाढत्या स्थलांतरामुळे बालके शाळाबाह्य होत आहेत. बालमजुरी व बालविवाहाचे प्रमाणही मोठे आहे. यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे शाळाबाह्य स्थलांतरित व शाळेत अनियमित असलेल्या बालकांची शोधमोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. (latest marathi news)

Nashik ZP News
Nashik Police : मनोरुग्ण महिलेसाठी उपनगर पोलिसांकडून मानवतेचे दर्शन! उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

त्यानुसार, शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी ५ जुलै ते २० जुलै या कालावधीत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत मोहिमेत आढळलेल्या मुलांना स्थानिक जवळच्या प्राथमिक शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.

या दोन तालुक्यांत मुले आढळलेली असली, तरी इतर तालुक्यांत अद्याप मुले सापडलेली नसल्याची नोंद आहे. शनिवार हा मोहिमेचा अंतिम दिवस आहे. त्या वेळी इतर तालुक्यांची माहिती येण्याची शक्यता आहे. मोहिमेचा अहवाल २५ जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाचे आहेत.

Nashik ZP News
Nashik News : राजमाता जिजाऊ मार्गावरील पथदीप बंद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com