येवला : जिल्हा परिषदेच्या शाळांना संगणक घ्यायचे म्हटले, की लोकवर्गणीशिवाय पर्याय नसतो...ही अडचण ओळखून वाड्या वस्त्यांवरील छोट्या मोठ्या १०१ शाळांना युवा नेते कुणाल दराडे यांच्या पुढाकारातून संगणकासह प्रिंटर वाटप करण्यात आले. यामुळे या शाळा डिजिटल साक्षर होऊन विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाचे धडे मिळणार आहेत. शाळेचे कामकाज देखील संगणकृत होण्यास मदत होणार आहे. (Over 100 schools will digitally literate in mansions)