Nashik News : पर्यावरणाचा समतोल टिकल्यास दुष्काळावर मात; पालकमंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन

Nashik News : सिद्धी फाउंडेशन संचलित मोसमखोरे जलसंवर्धन समितीने केलेल्या कार्याचा नाशिक जिल्ह्यासह राज्याने आदर्श घेऊन त्या पद्धतीने काम करावे.
Guardian Minister Dada Bhuse speaking at the tree plantation event.
Guardian Minister Dada Bhuse speaking at the tree plantation event.esakal
Updated on

Nashik News : सिद्धी फाउंडेशन संचलित मोसमखोरे जलसंवर्धन समितीने केलेल्या कार्याचा नाशिक जिल्ह्यासह राज्याने आदर्श घेऊन त्या पद्धतीने काम करावे. तसे झाल्यास पर्यावरणाचा समतोल टिकून दुष्काळावर मात करता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. सिद्धी फाउंडेशन संचलित मोसमखोरे जलसंवर्धन समितीच्या वतीने हरणबारी धरण प्रकल्पातून दहा हजार ब्रास गाळमुक्त अभियान. (Nashik News)

१५ हजार वृक्षारोपण कार्यक्रमाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मविप्र तालुका संचालक डॉ. प्रसाद सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. मंत्री भुसे, आमदार दिलीप बोरसे, द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांच्या हस्ते श्री उद्धव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

दादा भुसे म्हणाले, वृक्षतोडीचा ऱ्हास होत असताना दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सिद्धी फाउंडेशनच्या वतीने हरणबारी धरणातील गाळ काढल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. फाउंडेशनने बागलाण तालुक्यासह दुष्काळी भागाच्या ठिकाणी उपक्रम राबवल्यास शासनातर्फे लोकप्रतिनिधी या नात्याने अवश्य मदत करेल. तसेच, या कार्याचा इतर जिल्ह्यांनीही आदर्श घेऊन दुष्काळावर मात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज व मुख्यमंत्री शिंदे यांनी राबवलेल्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली. आमदार बोरसे यांनी सिद्धी फाउंडेशनला पुढील काळातही मदत करण्याची ग्वाही दिली. मंत्री भुसे, आमदार बोरसे यांच्या हस्ते समितीचे सदस्य डॉ. प्रसाद सोनवणे, प्रवीण भामरे, दीपक कांकरिया, अनिकेत सोनवणे, दिनेश सावळा, गजानन साळवे, राजेंद्र कुटे, सतीश भामरे. (latest marathi news)

Guardian Minister Dada Bhuse speaking at the tree plantation event.
Nashik News : ‘इकॉनॉमी क्लस्टर’ म्हणून विकसित करा; सतराव्या स्थापना दिन सोहळ्यात विभागीय आयुक्त गेडाम यांचे प्रतिपादन

बापू भोये, आर्थिक मदत करणारे प्रॉकल्याण, डंपर उपलब्ध करून देणारे द्वारकाधीशचे संचालक सचिन सावंत, अशोक कांकरिया, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत सोनवणे, पंकज भामरे, महेंद्र भामरे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुल्हेर, हरणबारी, अंतापुर, ताहाराबाद परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, अभियंता मनोज ठोके, उपअभियंता स्वप्निल खैरनार, वनाधिकारी शिवाजी सहाने, पोलिस अधिकारी पुरुषोत्तम शिरसाट, खंडेराव शेवाळे, किशोर पंडित, सुभाष नंदन, युवराज पवार, आर. एम. सूर्यवंशी, गंगाराम देशमुख.

Guardian Minister Dada Bhuse speaking at the tree plantation event.
Nashik News : गृहमंत्रालयाची आज पश्चिम प्रादेशिक परिषद!

निलेश कांकरिया, सुनील गवळी, अभिजीत सोनवणे, डॉ. मनोज शिंदे, नितीन मगर, श्याम अहिरे, डॉ. वेदांत सोनवणे, पोपट ठाकरे, सरपंच निंबा भानसे, काशीनाथ गवळी, योगेश सोनवणे, चुनीलाल ठाकरे, राजेंद्र मोरे, गोरख पाटील, डी. एस. देवरे, विजय पगार, सतीश सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, रोहित निकम, प्रमोद भामरे, योगेश नंदन, सुनील चव्हाण, शरद बागुल, उद्धव सोनवणे, जाकीर शेख यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

"हरणबारी धरण प्रकल्पातील गाळ काढल्यामुळे पाण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे. सिद्धी फाउंडेशनच्या वतीने दीडलाख वृक्ष लागवड करून संवर्धन करण्यात येणार आहे. पुढील काळात साल्हेर, मुल्हेर ऐतिहासिक किल्ले, अंतापुर, मांगीतुंगी, आशापुरी, कपार भवानी, जैतापूर तीर्थक्षेत्र परिसरात महसूल, वनविभाग व लोकप्रतिनिधींच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून संगोपन करण्यात येईल." - डॉ. प्रसाद सोनवणे, तालुका संचालक, मविप्र

Guardian Minister Dada Bhuse speaking at the tree plantation event.
Nashik News : पोलिस सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी चुरस; सोमवारी नूतन अध्यक्षाची निवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.