नाशिक : शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये मूळ मालकांअभावी शेकडो बेवारस वाहने पडून आहेत. या बेवारस वाहनांच्या मूळ मालकांना शोधून त्यांना त्यांची वाहने परत करण्यासंदर्भातील मोहीम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकारातुन घेण्यात आली असून, त्यानुसार वाहतूक शाखा आणि पुण्यातील गंगामाता वाहन शोध संस्थेने ३८ बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेतला आहे. (Owners of 38 abandoned vehicles traced)