ओझर : येथे महामार्गालगत कोट्यवधी रुपये खर्चून सर्व सुविधांयुक्त बसस्थानक बांधले. पण, स्थानकात बसच येत नसल्याने ही वास्तू सध्या धूळखात आहे. नवीन बसस्थानक बांधण्यामागील नेमका हेतूच साध्य होत नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. (ozar bus stands in dust Plight of passengers as bus is not coming)
नाशिकहून सुटणाऱ्या जलद बससह सर्व बसला ओझरला थांबा असूनही मोजक्या साध्या बसेस सोडल्या, जलद, अति जलद बस नवीन स्थानकात येत नाही. त्यामुळे प्रवाशांना थेट महामार्गावर यावे लागते. तरीही बस थांबत नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. विद्यार्थ्यांना मे महिन्याच्या सुट्या लागल्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.
नवीन बसस्थानकासमोर महामार्गावरील कटजवळ विविध ठिकाणी बसने जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी होते. कोट्यवधी रुपये खर्चून चार वर्षांपासून बांधण्यात आलेल्या स्थानकात ठराविक बस वगळता इतर बस येत नाहीत. आता तर नवीन स्थानकात बस यावी म्हणून महामार्गावर दोन्ही बाजूला कट देण्यात आला आहे. तरीही बस उड्डाणपुलावरून वेगाने जातात.
दूरचा प्रवास करायचा कसा?
ओझर येथून सटाणा, मालेगाव, धुळे, जळगाव, दोंडाईचा, चोपडा, अमळनेर, शिरपूर, नंदुरबार, साक्रीकडे जाणाऱ्या जलद, अतिजलद लांब पल्ल्याच्या बस जातात. हात देऊनही त्या थांबत नाहीत. पिंपळगाव, नांदगाव, मनमाड आगाराच्या काही बस स्थानकात येतात. मात्र, ओझर येथील अनेक प्रवाशांना मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबारकडे जायचे असते. मात्र, या बस थांबत नसल्याने अशावेळी कोणत्या बसने प्रवास करावा, असा प्रश्न उपस्थित होतो. (latest marathi news)
"पिंपळगाव बाजूकडे जवळच्या किंवा लांब पल्ल्याच्या गावांना जाण्यासाठी प्रवाशांना नवीन बसस्थानकावर जाण्यासाठी कुठलाही जवळचा रस्ता नसल्याने दीड किलोमोटरचा फेरा मारून जावे लागते. त्यासाठी एअर फोर्स कॉर्नरसमोर बोगदा करावा." - शब्बीर खाटिक, सामाजिक कार्यकर्ता, ओझर
"ओझर येथील नवीन बसस्थानकात पिंपळगाव, सटाणा, नांदगाव, मनमाड, नंदुरबारकडे जाणाऱ्या बससह मालेगाव, धुळे, शिरपूर, अमळनेर, जळगाव, भुसावळ, शिंदखेडा, चाळीसगाव मार्गावरील बस नवीन स्थानकात आल्या तर ओझरसह परिसरातील नागरिकांना याचा लाभ घेता येईल." - दीपक पाटील, एचएएल कामगार, ओझर
"नवीन स्थानकात काही साध्या बसेस येतात. परंतु, लांब पल्ल्याच्या बस येत नाहीत. लांब पल्ल्याच्या बस नवीन स्थानकावर येणार नसतील तर नवीन स्थानकाचा उपयोग काय? नवीन स्थानकात बसचे वेळापत्रक असलेला फलक लावण्यात यावा.' - अंजली वानखेडे, प्रवासी, ओझर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.