सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा
Nashik News : येथील नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे अवेळी धोरण व आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने घ्यावयाच्या काही दक्षतांबाबत कुठलीही आपत्कालीन व्यवस्था करण्यात अद्याप तरी नगर परिषद सरसावली नसल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यापासून तब्बल तीनवेळा काही तास पडलेल्या धुव्वाधार पावसामुळे शहर, उपनगर आणि गावाला जोडणाऱ्या मारुती वेस पुलासह अनेक ठिकाणी पाणी साचले. (Ozar view of rainy season city council has not yet made any emergency arrangements)
अशातच गावातील काही भागात सुरू असलेले रस्त्यांचे काम व उघड्यावर असलेले चेंबर पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकेदायक ठरत असून, यातून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. ओझरच्या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी वर्षभरानंतर दोन दिवस ओझरच्या सेवेसाठी ठरवले. इतक्या मोठ्या शहराला ते कामाचे तास पुरेसे नसल्याचे पुन्हा एकदा आपत्कालीन व्यवस्थेच्या रामभरोसेपणामुळे अधोरेखित झाले आहे.
अशातच प्रशासकांनी ठरवून दिलेल्या कामकाजाच्या दिवस पत्रकानुसार गेल्या आठवड्यात बुधवारी आलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी शुक्रवारी मात्र येवल्यासाठी दिले. तथापि, ते गुरूवारी येऊन गेल्याचे नागरिकांना कळलेच नाही. (latest marathi news)
सध्या तुंबलेल्या भुयारी गटार व ठिकठिकाणी चेंबर साफ करणे, अचानक वीज गायब होणे अशा काही आपत्कालीन व्यवस्था व दक्षतेबाबत अद्याप बैठकच झाली नसल्याचे समोर आले आहे. यावर बैठक घेऊन तातडीच्या उपयोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अग्निशमन गाडी नागरी सेवेत कधी?
ओझर नगर परिषदेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुदृढ होण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासनाने अग्निशमन वाहन दिले. परंतु, पंधरा-वीस दिवसांपासून ते उभेच आहे. त्याला लागणाऱ्या विशिष्ट कौशल्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती नेमक्या कोणत्या कारणास्तव लांबणीवर पडली, याबाबत अनेक तर्कित चर्चा आहे. अशातच सुरक्षेसारख्या महत्वाच्या कारणांमुळे अग्निशमन गाडीला त्या अनुभवाच्याच कर्मचाऱ्यांची भरती नगर परिषदने करावी, इतकीच माफक अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.