Nashik News : स्वामी समर्थांच्या पादुका 29 ला शहरात! विविध धार्मिक कार्यक्रम; भाविकांना मिळणार दर्शन

Nashik News : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथील पादुका व पालखीचे २९ एप्रिलला शहरात आगमन होणार आहे.
Paduka of Swami Samarth
Paduka of Swami Samarthesakal
Updated on

Nashik News : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथील पादुका व पालखीचे २९ एप्रिलला शहरात आगमन होणार आहे. २९ एप्रिल ते २ मे दरम्यान शहरातील विविध भागांत या पादुकांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. (Nashik Paduka of Swami Samarth in city on 29th news)

सोमवारी (ता. २९) राणेनगर येथील कैवल्य सोसायटीच्या प्रांगणामध्ये आगमन होणार आहे. येथे भाविकांसाठी पादुका दर्शन सकाळ सत्रात महाप्रसाद व सायंकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळी साडेनऊला इंदिरानगर येथे आशा नागरे यांच्या निवासस्थानी दर्शनार्थ उपलब्ध होतील, तर दुपारी बाराला भाभानगर येथे भारती कुक्कर यांचे निवासस्थानी महाप्रसाद तसेच श्री सत्यदत्त पूजन होणार आहे.

सायंकाळी पावणेसहाला मुंबई नाका येथील दत्त मंदिरात स्वामी आणि दत्तभेट घडवून आरती केली जाणारा आहे. त्यानंतर पुढे कालिका माता मंदिरात स्वामी पालखीचे आरती व स्वागत होऊन पालखी मेनरोडकडे मार्गस्थ होईल. मेन रोडच्या गणपती मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ होऊन ती जिजामाता चौक, दहिफुल मार्गे नगरकर लेन श्री दुर्गा मंगल कार्यालय, तीळभांडेश्वर लेन येथे पालखीचे स्वागत श्री रंगाशेठ दंडगव्हाळ यांच्याकडून करण्यात येणार आहे.

बुधवारी (ता. १) मुकुंद गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली सकाळी नऊला लघुरुद्र पूजन होणार आहे. दुपारी १२ वाजता जगदीश पाटील यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. विशाल तांबोळी यांच्यातर्फे महाप्रसाद करण्यात येणार आहे. येथून पुढे भांडी बाजार येथील श्री विठ्ठल मंदिर, मुरलीधर मंदिर, रामकुंड येथील कपालेश्वर मंदिर व गंगापूर रोड येथील सोमेश्वर मंदिर येथे दर्शनार्थ पोचतील. (latest marathi news)

Paduka of Swami Samarth
Dindori Lok Sabha Constituency : नाशिकमध्ये सामसूम; दिंडोरीत धामधूम! दिंडोरी मतदारसंघात पंचरंगी लढत होण्याची शक्यता

सायंकाळी साडेसहाला मखमलाबाद रोड संतोष पोळ गुरुजी व डॉ. कोडीलकर यांच्या निवासस्थानी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. २) सकाळी दहाला टागोरनगर येथील मंदार तगारे आणि जयेश आमले यांच्या निवासस्थानी दर्शनार्थ ठेवण्यात येणार असून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच नंतर आडगाव नाका येथे प्रवीण मुनोत यांच्या निवासस्थानी चहापान झाल्यानंतर पादुका व पालखी पिंपळगावकडे मार्गस्थ होणार आहे अशी माहिती अध्यक्ष विश्वस्त श्याम तांबोळी आणि उपाध्यक्ष जगदीश पाटील यांनी दिली.

आयोजनाकरिता संदीप खैरनार, केदार कुलकर्णी, बाळू बत्तासे, प्रशांत गाडगीळ, मिलिंद खाडे, केदार भामरे बळिराम चांडोले, पंकज चांडोले, सागर तांबोळी, युवराज पाटील, अभिजित तांबोळी, आनंद पाटील, राहुल जगताप, राजेश शिंगणे, करण कापुरे, दिनेश आहेर, नंदकुमार पतंगे, आध्यात्मिक समितीचे भाऊनाथ महाराज खैरनार, संतोष पोळ, मुकुंद खोचे, अशोक भय्याजी लोकवाणी, महिला मंडळ समिती सौ भारती कुकर सूचना कंसारा वंदना जोशी, सिद्धी कुलकर्णी, पल्लवी कुलकर्णी, अश्विनी आमले, माधवी तगारे, निर्मला आहेर, अक्षदा तांबोळी तर वैद्यकीय समितीमध्ये डॉ. दिलीप कुक्कर, डॉ. कोडीलकर डॉ. पल्लवी पाटील, डॉ. दीप्ती कुलकर्णी आदी प्रयत्नशील आहेत.

Paduka of Swami Samarth
Nashik Lok Sabha Election 2024: मतमोजणी केंद्रावर ‘जॅमर’ बसवा; शिवसेना (उबाठा) गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.