Nashik Pahine Waterfall : पहिनेला तरुणाईचा धिंगाणा; नाकाबंदी नावालाच

Nashik News : रविवारी सकाळपासूनच पावसाची संततधार असल्याने ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांतील धबधबे, ओढे-नाल्यासह निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नाशिककरांनी त्र्यंबकची वाट धरली.
RTO team taking action against drivers who are drunk and driving while checking motorists on the first route on Sunday.
RTO team taking action against drivers who are drunk and driving while checking motorists on the first route on Sunday.esakal
Updated on

Nashik News : रविवारी (ता. १४) सकाळपासूनच पावसाची संततधार असल्याने ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांतील धबधबे, ओढे-नाल्यासह निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नाशिककरांनी त्र्यंबकची वाट धरली. यामुळे पहिने फाट्यावर वाहनाच्या लांबच्या लांब रांगा होत्या. तर, लोणावळ्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे आदेश दिलेले असताना. (Nashik Pahine Waterfall)

पहिने फाट्यावर केवळ बॅरिकेटिंग करून नाकाबंदी करण्यात आली. मात्र, पर्यटनासाठी आलेल्या तरुणाईकडून मद्याच्या धुंदीत मौजमजा करीत अक्षरश: धिंगाणाच घालण्यात आला. नाशिक शहरापासून २५ किलोमीटर अंतरावरील त्र्यंबक रोडवरील पहिने हे पावसाळ्यातील पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. रविवारी (ता. १४) नाशिकसह त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने त्र्यंबकच्या दिशेने चारचाकी कार, दुचाक्यांनी रस्त्यावर गर्दी केली.

पहिने फाट्यापासून ते नेकलेस धबधब्यापर्यंत अक्षरश: वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यालगत दुचाकी-चारचाकी वाहने पार्क करून निसर्गाचा आनंद लुटत होती. कुटुंबीयांसह आलेले ओढ्या नाल्यासह पावसाचा आनंद घेत होते. तर, दुसरीकडे तरुणाई मात्र मद्याच्या नशेमध्ये बेधुंद होऊन रस्त्यावरच धिंगाणा घालत होती. हातात मद्याच्या बाटल्या नाचवत ‘रेनडान्स’ चा आनंद घेतानाच रस्त्यावरील रहदारीलाही अडथळा निर्माण करीत होते.

नाकाबंदी नावालाच

पहिने फाट्यावर बॅरिकेटींग करण्यात आले होते. परंतु, वाहनांची तपासणी करण्यासाठी अंमलदारच नव्हते. पुढे अनेक ठिकाणी रस्त्यालगत वाहने लावून पर्यटक पावसाचा आनंद घेत असताना, धबधब्यापर्यंत जाण्यासाठी जीवाचा धोका पत्करत होते. नेकलेस धबधबा परिसरात तर पर्यटकांची तोबा गर्दी होती. (latest marathi news)

RTO team taking action against drivers who are drunk and driving while checking motorists on the first route on Sunday.
Nashik Monsoon Update : जिल्ह्यात सरासरी 13 मिलिमीटर पाऊस!

पोलिस वाहन केवळ रस्त्यावरून गस्त घालत होते. पोलिस नसल्याने धिंगाणा घालणाऱ्या तरुणांची मुजोरी वाढत असल्याचे दिसून आले. एकेका दुचाकीवर चारचार तरुण-तरुणी रॅशड्रायव्हिंग करीत होते. यातून पोलिस अधीक्षकांच्याच आदेशाला यंत्रणेकडून हरताळ फासल्याचे दिसून आले.

सेल्फीसाठी जीवही धोक्यात...

पहिने रस्त्याच्या एका बाजूला डोंगर रांग तर दुसऱ्या बाजूला उतारीची कपार व काहीशी दरीही आहे. अशाठिकाणी काही तरुणाई धोकादायकरित्या उभे राहत मोबाईलमध्ये सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्यात रिमझिम पावसासह वाराही असल्याने त्यातून दूर्घटनेचीही शक्यता होती. परंतु तरीही जीव धोक्यात घालून तरुणाईला सेल्‌फीचा मोह आवरत नव्हता. तर काही तरुणाई डोंगरकपार्यातील उंचावरील धबधब्यापर्यंत जाण्याचाही प्रयत्न करीत होती.

आरटीओकडून कारवाई पण...

आरटीओच्या पथकाकडून पहिने रस्त्यावर बॅरिकेटिंग करून ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. मोटार वाहन निरीक्षक मनिषा चौधरी, उपनिरीक्षक क्षितीजा साळुंके, उपनिरीक्षक प्राची मोडक यांच्या पथकाकडून कारवाई करताना त्यांच्याकडे एकच ब्रेथॲनालायझर होते. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. तर मद्यपान करणारे वाहनचालक हुज्जतही घालत होते. त्यामुळे या पथकालाही काढता पाय घ्यावा लागला.

RTO team taking action against drivers who are drunk and driving while checking motorists on the first route on Sunday.
Nashik News : पंचवटीत जागोजागी पाण्याची डबकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.