Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तिनाथांची पालखी लोणारवाडीत दाखल

Nashik News : त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी व पायी दिंडीचे तालुक्यातील पास्ते मार्गे ,जामगाव, खापराळे, सरदवाडी आदी मार्गे लोणारवाडी येथे आगमन झाले.
Spectacular view of Varkaras in Paste Ghat
Spectacular view of Varkaras in Paste Ghatesakal
Updated on

Nashik News : त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी व पायी दिंडीचे सोमवारी (ता.२४) तालुक्यातील पास्ते मार्गे ,जामगाव, खापराळे, सरदवाडी आदी मार्गे सायंकाळी लोणारवाडी येथे आगमन झाले. उद्या मंगळवारी सिन्नर शहरात सकाळी आगमन होणार असल्याने पालखीच्या स्वागताची शहरातील नागरिकांनी जोरदार तयार केली आहे. (palanquin of Saint Nivruttinath entered Lonarwadi)

लोणारवाडी येथे पालखीसह सुमारे २५ हजार वारकरी मंडळींच्या स्वागत ग्रामस्थांसह प्रशासनाने जय्यत तयारी सुरु आहे. वारकऱ्यांना दूध, पुरणपोळी, सार-भाताचे स्वादिष्ट भोजन आणि किर्तनसेवेची गेल्या अनेक वर्षांची परंपरा ग्रामस्थांनी जोपासली आहे.

२५ हजार वारकऱ्यांची तयारी

दरवर्षी संतश्रेष्ठ निवृत्ती नाथांच्या पालखीच्या आतुरतेत ग्रामस्थ स्वागताच्या तयारी लागतात. जवळपास पंधरा दिवस आधीपासूनच झपाटून काम करतात. २० ते २५ हजार वारकरी पायी दिंडीत सहभागी झाले असतात. किर्तनसेवेपासून भोजन, निवास व्यवस्थेत ग्रामस्थ उणीव ठेवत नाही. पूर्वी भोजनात आमरस आणि पुरणपोळीचा समावेश असायचा. मात्र काही वर्षांपासून आमरसा ऐवजी दूध आणि पुरणपोळी व सार भाताचा बेत केला होता.

भोजन व्यवस्थेतील आचारी, शिधा स्वीकारणारे तसेच सहभागी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. पायी दिंडीतील वारकरी महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली होती. वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, अशी खबरदारी ग्रामस्थांनी घेतली होती. (latest marathi news)

Spectacular view of Varkaras in Paste Ghat
Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तिनाथांची पालखीचा उद्या रिंगण सोहळा; स्वागतासह मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय पथक

सरपंच जयश्री लोणारे, माजी सरपंच डॉ. सदाशिव लोणारे, कैलास गोळेसर, उपसरपंच योगेश लोणारे, विठ्ठल लोणारे, भानुदास लोणारे, जगन मिठे, नारायण पगर, नितीन झगडे, अर्जुन भगत आदींसह ग्रामस्थ स्वागतासह नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. शासनाने यंदा विविध सुविधांसाठी ३ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला.

त्यामुळे वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करणे सोपे झाले. खासदार राजाभाऊ वाजे व आमदार माणिकराव कोकाटे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व मदत होत आहे. असे लोणारवाडीचे सरपंच जयश्री लोणारे यांनी सांगितले

पास्ते घाटातून मार्गक्रमण

टाळ मृदुंगाचा गजरात पास्ते घाटा मार्गे दिंडी पास्ते येथे विसावली सोमवारी दुपारचे जेवण पास्ते ग्रामस्थांकडून देण्यात आले. त्यानंतर दिंडी लोणारवाडी येथे मुक्कामी निघाली. मंगळवारी सकाळी सिन्नर शहरात दिंडीचे आगमन होणार असून, दुपारी दातली येथे गोल रिंगण होणार आहे.सहकारी सोसायटीचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ घुगे, युवा नेते उदय सांगळे, भाजपचे जयंत आव्हाड, सरपंच स्नेहल आव्हाड, उपसरपंच मनीषा भालेराव, शरद आव्हाड, विनोद घुगे यांच्यासह मुंबई येथील मंडळांतर्फे दिंडीचे स्वागत करण्यात आले.

Spectacular view of Varkaras in Paste Ghat
Sant Nivruttinath Palkhi : वारकऱ्यांसाठी रुग्णवाहिकेसह ‘श्वास’तर्फे डॉक्टरांचे पथक; 4 डॉक्टर सतत 28 दिवस देणार सेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.