नाशिक/नाशिक रोड : नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गाव चौफुलीवर ब्रेक फेल झालेल्या भरधाव वेगातील राजगुरूनगर-नाशिक या बसने तीन दुचाकींसह शिर्डी-नाशिक बसला पाठीमागून धडक दिली. या विचित्र अपघातामध्ये एका दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार, तर दोघे दुचाकीस्वार गंभीर, तर बससह कारमधील असे २५ प्रवासी जखमी झाले. जखमींवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सदरचा अपघात गुरुवारी (ता. ८) दुपारी सव्वाबारा ते साडेबाराच्या दरम्यान झाला. या प्रकरणी राजगुरूनगर-नाशिक बसचालक राजेंद्र उईके यांनी बस भरधाव चालवून प्रवाशांच्या जीवितास धोका उत्पन्न केला. तसेच दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Nashik palase Bus fire Accident Thrilling of burning bus on Palase Chaufuli Two on bike killed 25 passengers injured Nashik News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजगुरूनगर-पुणे ही परिवहन महामंडळाची बस (एमएच ०७, सी ७०८१) नाशिकच्या दिशेने भरधाव येत होती. शिंदे टोलनाका ओलांडल्यानंतर बस पळसेगाव चौफुलीजवळ आली असता, गतिरोधक पाहून बसचालक राजेंद्र अंबादास उईके (वय ३६, रा. राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) यांनी बसला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता, ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे भरधाव वेगातील या बसने पल्सर दुचाकीला (एमएच १७ सीजे ४८७४) पाठीमागून धडक दिली.
यात दुचाकीवरील रवींद्र सोमनाथ विशे (वय ३०), मदन दिनकर साबळे (३९, रा. दोघे रा. समशेरपूर, ता. अकोले, जि. नगर) हे दुचाकीसह बसच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाले. तर बसने अव्हेंजर दुचाकी (एमएच १५, एचई ३३१९) व युनिकॉर्न दुचाकी (एमएच १५, जीडब्ल्यू ९२०१) यांनाही धडक दिल्याने या दुचाकीवरील महेश शंकर क्षत्रिय (रा. सिन्नर), नवनाथ छबू गिते (४२, रा. वडझिरे, ता. सिन्नर) हे दोघे गंभीर असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तीन दुचाकींना धडक दिल्यानंतर या बसने शिर्डीकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या बसला (एमएच १४, बीटी ३६३५) पाठीमागून धडक दिली. यात धडक बसताच बस पुढे असणाऱ्या क्रेटा कारवर (एमएच १७, बीव्ही ७३५८) जाऊन आदळली. या विचित्र अपघातांमध्ये तीन दुचाकी, दोन बस आणि दोन कारचे नुकसान झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
...अन् बसने पेट घेतला
राजगुरूनगर बसखाली आलेल्या दुचाकींनी पेट घेतल्याने बसनेही पेट घेतला. ही बाब लक्षात येताच बसमधील प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी धाव घेतली. काही प्रवाशांनी बसच्या खिडकीतून बाहेर उड्या घेत आपला जीव वाचविला, तर त्या वेळी आसपासच्या नागरिकांनी बसच्या दिशेने धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळातच आगीने बसला वेढा घातला आणि काही क्षणात बस खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब, पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
आयुक्त घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, पौर्णिमा चौघुले, जिल्हा आरटीओ प्रदीप शिंदे, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे, सिद्धेश्वर धुमाळ व पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आयुक्त नाईकनवरे यांनी जखमी प्रवाशांना तातडीने उपचार मिळण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
जखमींची नावे अशी-
दशरथ राजू मोहिते (वय ७२, रा. कनकापूर, ता. देवळा), मुमताज कमखद्दीन शेख (५०, रा. संगमनेर, जि. नगर), आफरीन रईस शेख (२८, रा. संगमनेर, जि. नगर), हनिफ गफूर शेख (३५, रा. कातिपूरा, ता. सिन्नर), सरस्वती दयानंद शिंदे (२३, रा. मोह, सिन्नर), दीपक अशोक शिंदे (३५, रा. मोहगाव, सिन्नर), फुलाबई अनिल पवार (४०, रा. दापूर, सिन्नर), भाईदास काशीनाथ भदाणे (६५, रा. जेधापूर, ता. साक्री, जि. धुळे), मीनाबाई भाईदास भदाणे (६०, रा. जेधापूर, ता. साक्री, जि. धुळे), योगेश बन्सी साबळे (३२, रा. नांदूरशिंगोटे, सिन्नर), सुनंदा अशोक दिघे (६०, रा. बागवानपुरा, भद्रकाली, नाशिक), अश्विनी दीपक कुलथे (३२, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक), रविराज चंद्रकांत गवळी (३१, रा. पिंपरी चिंचवड), नवनाथ परसराम कडाळे (५०, रा. पोळ सांगवी, ता. निफाड, नाशिक), रूपाली सचिन दिवटे (३५, रा. ता. अकोले, जि. नगर), समृद्धी सचिन दिवटे (१२, रा. अकोले, जि. नगर), हर्षदा मंगेश पोंदे (१८, रा. भरतनगर, संगमनेर, जि. नगर), सीताराम देवराम कुरणे (६८, रा. सिन्नर), ओवेश अहमद अन्सारी (३३, रा. सायन, मुंबई), मुस्तफा रईस शेख (१९, रा. संगमनेर), सईदा गणी इनामदार (६५, रा. संगमनेर), नझिमा हबीब सय्यद (६३, रा. संगमनेर), शकुंतला नामदेव पवार (६०, रा. दापूर, सिन्नर), राजसिंह मोहरसिंह (२२, रा. गंगापूर रोड, नाशिक), दुचाकीस्वार नवनाथ छबू गिते, दुचाकीस्वार महेश क्षत्रिय (रा. सिन्नर).
मृत : रवींद्र सोमनाथ विसे (रा. समशेरपूर, ता. अकोला, जि. नगर), मदन दिनकर साबळे (रा. समशेरपूर, ता. अकोला, जि. नगर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.