Nashik News : शहरात वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची दहशत; नाशिककरांमध्ये भितीचे वातावरण

Nashik : स्ट्रीट क्राईमविरोधात पोलिस आयुक्तांनी एकापेक्षा एक असे उपक्रम शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत सुरू केले.
damage car (file photo)
damage car (file photo)esakal
Updated on

Nashik News : स्ट्रीट क्राईमविरोधात पोलिस आयुक्तांनी एकापेक्षा एक असे उपक्रम शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत सुरू केले. परंतु गेल्या आठवडाभरात शहराच्या उपनगरांमध्ये रात्रीच्या वेळी वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या. यामुळे नाशिककरांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर, गुंडांचा रस्त्यावरील धिंगाणा मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करीत गुंडाच्या मुसक्या आवळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ( Panic of vehicle vandals in city creates an atmosphere of fear )

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाईसह कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यापाश्‍र्वभूमीवर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविले जात असून रात्रीच्या गस्ती वाढविण्यात आल्या आहेत. दामिनी-निर्भया पथके सज्ज केली आहेत. असे असतानाही गेल्या आठवडाभरात शहराच्या उपनगरांमध्ये वाहनांच्या तोडफोडी व जाळपोळीच्या चार घटना घडल्या आहेत.

यामुळे नाशिककरांमध्ये भिती पसरली आहे. तर रात्रीच्या वेळी गुंड, टवाळखोर यांच्याकडून होणाऱ्याया घटनांनी शहराची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सततच्या बंदोबस्तात व्यस्त होते. तरीही नियमित गस्ती सुरूच होती. मात्र, तरीही टवाळखोरी करणाऱ्या गुन्हेगारांनी डोकेवर काढले आहे. (latest marathi news)

damage car (file photo)
Nashik Accident News : वाहतूक ब्लॅक स्पॉटवरील अपघात मुक्ती कागदावरच

मतदाना होण्यापूर्वी भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाचवेळी पाच ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली तर, पंचवटी, सिडको, इंदिरानगर व सातपूरमध्ये वाहनांच्या तोडफोडीच्या सलग घडना घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होऊन पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. परंतु एकापाठोपाठ एक घटना घडत असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

आठवड्यातील घटनाक्रम

- १६ मे : भद्रकाली हद्दीत ११ वाहनांची जाळपोळ

- २१ मे : पंचवटी हद्दीत हरिओम नगरमध्ये चार दुचाकी, रिक्षाची तोडफोड

- २२ मे : अंबड हद्दीत तोरणानगरमध्ये रिक्षाची जाळपोळ

- २५ मे : इंदिरानगर हद्दीत चार-पाच कारची तोडफोड

अवैध धंद्यांना मोकळा हात

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अवैध धंद्यांना पोलिसांची ‘ना-हरकत’ असल्याचे लपून राहिलेली नाही. परिणामी, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल्स, हातगाड्या, चायनीज ठेल्यावर टवाळखोरांकडून खुलेआम पार्ट्या केल्या जातात. त्यामुळे हेच टवाळखोर मध्यरात्रीच्या सुमारास नागरिकांच्या वाहनांची जाळपोळ-तोडफोड करतात. पोलिसांकडून कारवाई करून संशयितांना अटक केली जाते परंतु असे घडणारे प्रकार मात्र थांबलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव टीका केली जात आहे.

damage car (file photo)
Nashik ZP News : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना यंदा ‘ब्रेक’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.