Nashik News : पंकज भुजबळांच्या रूपाने नाशिकला आमदार; मंत्री भुजबळांना वाढदिवसाचे ‘गिफ्ट’

Nashik News : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पंकज भुजबळ यांची निवड झाली आहे.
Pankaj Bhujbal
Pankaj Bhujbalesakal
Updated on

नाशिक : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पंकज भुजबळ यांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात सलग दहा वर्षे आमदार राहिलेल्या पंकज भुजबळांना पुन्हा आमदारकीची संधी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यांच्या रूपाने नाशिकला अजून एक आमदार तर मिळालाच, त्याहीपेक्षा विशेष म्हणजे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना वाढदिवसाचे ‘गिफ्ट’ मिळाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. (Pankaj Bhujbal Birthday Gift to Nashik MLA Minister Bhujbal )

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, त्याच दिवशी राज्यपाल नियुक्त सात आमदारांची घोषणा झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांची निवड झाली. नांदगावमध्ये २००९ ते २०१९ कालावधीत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. या मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदार निवडून येत नाही, हा टिळा पुसून टाकत त्यांनी इतिहास घडविला.

नस्तनपूर तीर्थक्षेत्राचा विकास केला. याशिवाय, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सरचिटणीस, मुंबई एज्युकेशन ट्रस्ट, विद्यार्थी सेवा संघ व अखिल अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. पंकज यांच्या रूपाने जिल्ह्याला विधान परिषदेचा एक आमदार मिळाला. त्यामुळे विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे. (latest marathi news)

Pankaj Bhujbal
Nashik News : तलाठी, कोतवाल, अव्वल कारकून नामे नामशेष! राज्य सरकारकडून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल

पंकज भुजबळांचा परिचय

- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सरचिटणीस

- मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेचे विश्वस्त

- पालघर जिल्ह्यातील वाळीव हे आदिवासी गाव दत्तक

- मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून ५०० खाटांचे कोविड सेंटर उभारले

- विद्यार्थी सेवा संघ संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून गेली ३० वर्षे कार्यरत

- या संस्थेच्या माध्यमातून ५० हजार विद्यार्थ्यांची सराव परीक्षा

- विद्यार्थी सेवा संघाच्या माध्यमातून क्रीडा शिबिरांचे आयोजन

- अखिल अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सरचिटणीस

Pankaj Bhujbal
Nashik Crime News : वावी विद्यालय परिसरात स्वयंघोषित दादा अन भाईंची दहशत; प्राणघातक हत्याराने केले एकास जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.