Nashik News : विविध उपक्रमांतून शाळा बदलत असताना शालेय परिसरातच काही शाळांमध्ये ‘परसबाग’ विकसित केल्या आहेत. या परसबागेतील भाजीपाला शाळांच्या दैनंदिन पोषण आहारात वापरला जाणार आहे. परसबागेतील पिकविलेल्या भाजीपाला आणि इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने आदेश काढला असून, केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्माण करून त्यामधून उत्पादित भाजीपाला आणि इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. ()
परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येतात. राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकविलेला भाजीपाला, फळे आदींचा शालेय पोषण आहारात समावेश करून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. गेल्या वर्षात २४ हजार ७४१ शाळांमध्ये ‘परसबाग’ कार्यान्वित करण्यात आली होती. यंदा ग्रामीण भागासह नागरी भागातही कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
परसबाग स्पर्धेतील सहभागी शाळांसाठी शंभर गुणांचे मूल्यांकन प्रगतिशील शेतकरी व त्यांच्या माध्यमातून ऑक्टोबरमध्ये करण्यात येईल. तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर उत्कृष्ट परसबागांना रोख रकमेच्या बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात २१ हजार ५००, तर जिल्हा पातळीवरील बक्षिसांसाठी ३३ हजार ५०० रूपयांची तरतूद सुचवली आहे. जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेंतर्गत शालेय शिक्षण विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत शासन निर्णय आहे.
शाळांमधील परसबागांची संरचना, संरक्षण भिंत उभारणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, परसबागांना पाण्याची सुविधा, सोलर पंप बसविणे व इतर आवश्यक बाबींसाठी योजनेंतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे. परसबाग उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रमातील निधीची नियमाप्रमाणे मागणी जिल्हा नियोजन विकास समितीकडे करावी लागणार आहे. (latest marathi news)
रोख बक्षीस तालुका पातळीवर
प्रथम -७५००
द्वितीय -५०००
तृतीय -३०००
प्रोत्साहनपर-२०००
जिल्हा पातळीवर
प्रथम -१५०००
द्वितीय -११०००
तृतीय -७५००
परसबागेचे फायदे
*विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होईल
*विद्यार्थांना नवनिर्मितीचा आनंद मिळतो
*ताजा व टवटवीत भाजीपाला रोज उपलब्ध होईल
*विद्यार्थी उपक्रम व कृतीशीलता, उत्पादक कौशल्य विकास होईल
*समाजाचा सहभाग व सहकार्य वाढीस लागेल
''शाळेच्या आवारात जागा उपलब्ध असल्याने अतिशय उत्तम परसबाग विकसित केली. शाळेला दररोज वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध झाल्या. विद्यार्थ्यांना जबाबदारी दिली त्यामुळे उपस्थिती वाढली.''- आधार देवरे, निवृत्त मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सायने खुर्द
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.