सिन्नर : बिड्या वळणाऱ्या माता-पित्यांच्या कष्ट फलश्रुत करायचे. मर्यादित संसाधने असली तरी काय झाले, जिद्दीच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊन करिअर घडवायचे. या ध्येयाने पछाडलेल्या डुबेरे (ता. सिन्नर) मधील युवकांनी अनोखी परंपरा प्रस्थापित केली आहे. जेमतेम दीड-दोनशे वस्तीच्या गावातून आजवर पोलिस, सैन्य आणि अग्निविर या योजनांतून पन्नासवर युवक कर्तव्य बजावत आहेत. (parents laborers children soldiers in police army)