Nashik : घासाला काकस्पर्शासाठी अनेकांना स्मृतिवनाचा आधार; तपोवन रोडवरील उद्यानात मोठ्या संख्येने कावळ्यांचा अधिवास

Nashik : सद्या पितृपक्ष सुरू असून बुधवारच्या (ता.२) सर्वपित्री अमावस्येने त्याची समाप्ती होत आहे. वृक्षराजी कमी झाल्याने काकस्पर्शही दुर्मिळ झाला आहे,
crows of Tapovan Road
crows of Tapovan Road esakal
Updated on

नाशिक : सद्या पितृपक्ष सुरू असून बुधवारच्या (ता.२) सर्वपित्री अमावस्येने त्याची समाप्ती होत आहे. वृक्षराजी कमी झाल्याने काकस्पर्शही दुर्मिळ झाला आहे, मात्र बदललेल्या या परिस्थितीतही मोठ्या संख्येने कावळ्यांचा अधिवास असलेले तपोवन रोडवरील पंचवटी स्मशानभूमी शेजारील स्मृतिवन उद्यान अनेकांसाठी आधार ठरत आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत रामतीर्थ परिसरात मोठ्या संख्येने झाडे होती. त्यामुळे कावळ्यांसह इतर पक्षांची मोठी संख्या होती. (park on Tapovan Road is home to large number of crows )

येथील गंगा गोदावरी मंदिराच्या छतावर सहज काकस्पर्श होत होता, त्यासाठी या छतावर श्राद्धविधीसाठी आलेल्यांची मोठी गर्दी व्हायची. एवढेच नव्हे तर जुन्या नाशिकमधील अनेक घरांच्या कौलांसह छतावरही सहज काकस्पर्श होत होता. कालौघात जुन्या मातीच्या वाड्यांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतली.

त्यामुळे जंगली कबुतरांची संख्या मोठ्या संख्येने वाढली, परंतु पोपट, कावळा, चिमणी, साळुंकी आदी पक्षांची संख्या घटल्याचे चित्र आहे. पितृपक्षातील अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत. मागील दहा-बारा दिवसांपासून स्मृतिवन उद्यानाच्या भिंतीलगत कावळ्याला घास देण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे. सकाळी दहा ते बारा यावेळेत ही संख्या मोठी असते. (latest marathi news)

crows of Tapovan Road
Nashik News : मनपा विभागीय कार्यालय अभ्यासिका अनेक वर्षापासून बंद!

श्राद्ध विधीसाठी येणारांची पसंती

गोदाघाटावर रोज शेकडो दशक्रिया विधी होतात, विधीनंतर पिंडदान केले जाते. यासाठी स्मृतिवन उद्यानालगत सकाळपासून मोठी गर्दी असते. सद्या पितृपक्ष असल्याने येथील गर्दीत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे काकस्पर्श दुर्मिळ झालेला असताना दुसरीकडे या उद्यानाची भिंत अनेकांसाठी आधार ठरत आहे.

स्वच्छतेची गरज

सद्या काकस्पर्शासाठी शेकडोजण याठिकाणी येतात, या ठिकाणची नियमित साफसफाई होत नसल्याने आधी ठेवलेल्या घासाजवळच दुसरा घास ठेवावा लागतो, मात्र दिवसेंदिवस येथे येणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली आहे.

crows of Tapovan Road
Nashik YCMOU : ‘मुक्त’च्‍या प्रवेशासाठी पुन्‍हा मुदतवाढ; 9 ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणीची संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.